Sunday, July 25, 2021
HomeमनोरंजनAlia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For...

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception – आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला (Alia Bhatt Fashion) एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लुक चांगलाच दिसावा, याबाबत तुला दबाव जाणवतो का?’ यावर उत्तर देत आलियाने म्हटलं की, ‘माझ्यावर कोणताही दबाव नाही, पण हो, मी स्वतःसाठीच हा नियम तयार केला आहे. मला स्वतःसाठी चांगले दिसण्याची इच्छा आहे. केवळ एअरपोर्टवरच मला छान दिसायचं नाहीय तर दैनंदिन जीवनातही मी चांगलेच दिसण्याचा प्रयत्न करते. दरम्यान चांगले दिसणे म्हणजे प्रत्येक वेळेस मेनिक्युअर पेडीक्युअर करत राहा, असा त्याचा अर्थ अजिबातच होत नाही. हिट आणि फिट, खूश राहणे आणि चांगले करिअर घडवणे म्हणजे माझ्यासाठी सुंदर दिसण्याप्रमाणेच आहे’.

दरम्यान सुपर क्युट आणि हुशार अभिनेत्री आलिया भट रेड कार्पेट इव्हेंटमध्येच नव्हे तर दैनंदिन जीवन किंवा पार्टीमध्ये शानदार आउटफिट्स परिधान करून जाते. म्हणूनच मित्र-मैत्रिणींचे लग्न तसंच एखाद्या कौटुंबिक सोहळ्यासाठी आलिया अशाच कपड्यांची निवड करते, ज्यामुळे तिचा लुक चर्चेचा विषय ठरेल. तिचा असाच शानदार लुक चुलत बहिणीच्या लग्नातही पाहायला मिळाला होता. (फोटो सौजन्य -इंडियाटाइम्स/योगेन शाह)

​लेहंग्याचं हटके डिझाइन

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

आलिया भटची चुलत बहीण आणि मुकेश भट यांची कन्या साक्षी भटने वर्ष २०१९ मध्ये बॉयफ्रेंड मजाहिरशी लग्न केले. आलियाने तिच्या चुलत बहिणीच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमासाठी एकापेक्षा एक जबरदस्त लुकची निवड केली होती. रिसेप्शन पार्टीसाठी अभिनेत्रीने घातलेल्या पांढर्‍या लेहंग्याचे आजही कौतुक केले जात आहे. दरम्यान आलियाचा हा लुक असा होता, जे बहुतांश महिला परिधान करणं टाळतात. कारण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून स्टायलिंग करणं फार कठीण असते. पण आलियाचा लुक पाहून हेच दिसतंय की पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करूनही स्टायलिश लुक मिळू शकतो.

(अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसतेय प्रचंड सुंदर, पतीसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर)

आलिया भटचा स्टायलिश लुक

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

बहिणीच्या लग्नासाठी आलिया भटने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर कनिका कपूर यांच्या ‘हाऊस ऑफ चिकनकारी’ फॅशन लेबलचा आयव्हरी रंगाचा लेहंगा निवडला होता. ज्याचे टेक्श्चर्ड -भरतकाम आणि डिझाइन अभिनेत्रीवर शोभून दिसत होतं. हा एक प्रकारचा थ्री पीस सेट होता, ज्यात बोल्ड लुक चोळी, मॅचिंग दुपट्टा आणि स्कर्टचा समावेश होता. लेहंग्यावर पूर्णतः हाताने वर्क करण्यात आलं होतं. तिनं परिधान केलेला लेहंगा वजनाने हलका होता. हे आउटफिट तयार करण्यासाठी कॉटन-सिल्क, नेट, ट्युल आणि शिमर कपड्यांचा वापर करण्यात आला होता.

(मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक)

​सुंदर एम्ब्रॉयडरी

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

आलियाने परिधान केलेला आयव्हरी रंगाच्या लेहंग्यामध्ये हँडमेड कशीदाकारी पारंपरिक एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं. यामध्ये गोल्डन बीड्स वर्कही आपण पाहू शकता. लेहंग्याच्या हेमलाइनवर गुलाबी रंगाची पातळ गोटा पट्टी जोडण्यात आली होती.

चिकनकारी एम्ब्रॉयडरी करण्यापूर्वी कपड्यांवर छाप्याच्या माध्यमातून ब्लॉक प्रिंट तयार केलं जातं. त्यानंतर डिझाइन पॅटर्न्सवर रेशीमच्या धाग्यांपासून एम्ब्रॉयडरी केली जाते.

(करिश्मा कपूरने बिकिनी घालून साजरा केला वाढदिवस, बोल्ड लुक पाहून चाहते झाले होते घायाळ)

​बोल्ड डिझाइनर ब्लाउज

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

वजनदार एम्ब्रॉयडरी असणाऱ्या लेहंग्यावर आलियाने कॉर्सेट स्टाइल ब्लाउज परिधान केला होता. ज्यामुळे तिला मॉडर्न लुक मिळाला होता. ब्लाउजमध्ये स्वीटहार्ट नेकलाइन आणि स्किनी स्ट्रॅप्स स्लिव्ह्ज डिझाइनर जोडण्यात आले होते. चोळीवर हँडमेड वर्क करण्यात आलं होतं, यासाठी नाजूक मोत्यांचाही वापर करण्यात आला होता. तर लेहंग्याचा दुपट्टा नेट फॅब्रिकपासून करण्यात आला होता.

(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)

​परफेक्ट स्टायलिंग

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times

आलियाने या लेहंग्यावर कमीत कमी ज्वेलरी परिधान करण्यावर भर दिला होता. यासाठी तिनं आम्रपाली ज्वेल्सने डिझाइन केलेली चांदबाली परिधान केली होती. यासह तिनं नेकपीस किंवा चोकर कॅरी केलं नव्हतं. या झुमक्यांचं डिझाइन सुद्धा आकर्षक होतं. नॅचरल टोन मेकअपसह तिनं स्लीक बन हेअरस्टाइल केली होती.

(सोनमच्या ‘या’ लुकवर झाली होती टीका, नोरानंही घातले तसेच बोल्ड आउटफिट! कोण दिसतंय स्टायलिश?)Source link

Alia Bhatt Wore Ivory Colour Lehenga Designed By House Of Chikankari For Sakshi Bhatt Wedding Reception - आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक | Maharashtra Times
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News