Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर...

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला तरीही तिचे मोहक रूप आणि स्टाइलची लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. इंस्टाग्राम पेजवर नव्या आपले वेगवेगळ्या रूपातील फोटो पोस्ट करत असते. विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.

इंस्टाग्रामवरील तिच्या स्टायलिश फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला जातो. नुकतेच असेच काहीसे घडलंय. या सुंदर तरुणीने अतिशय मोहक व स्टायलिश लुकमधील फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @navyananda)

​स्टाइल आणि मोहकतेच मिश्रण

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

नव्याने मैत्रिणीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहमीप्रमाणे तिच्या कपड्यांच्या निवडीमध्ये स्टाइल आणि मोहकतेचं मिश्रण पाहायला मिळत आहे. यात आपण नव्याचा प्रोफेशनल लुकची झलक पाहू शकता. तिनं पांढऱ्या रंगाच्या कॉलर्ड शर्टवर निळ्या रंगाचा स्वेटर घातला आहे. यावर तिनं स्लिमफिट जीन्स मॅच केली होती.

​नव्याच्या नैसर्गिक सौंदर्याने जिंकलं हृदय

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

स्टायलिश लुक मिळावा यासाठी नव्याने चंदेरी रंगाची चेन आणि पेंडेंट घातलं होतं. नेहमीप्रमाणे तिनं लाइट टोन मेकअपची निवड केली होती. तर साधी मिडल पार्टेड हेअरस्टाइल केली आहे. नव्याचा हा लुक प्रचंड साधा होता, पण यानिमित्ताने तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन चाहत्यांना घडलं.

​स्टायलिश लेदर जॅकेट

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

नव्या नेहमीच आपल्या सुंदर-सुंदर लुकने लोकांचे हृदय जिंकत असते. याची झलक आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. लेदर जॅकेट घालून तिनं स्वतःचा स्टायलिश लुक फ्लाँट केला आहे. एका फोटोमध्ये तिनं लाल रंगाचं टॉप तर दुसऱ्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्टवर जॅकेट घातल्याचं दिसत आहे. तिचे हे दोन्ही लुक कमाल दिसत आहेत.

​स्नेक प्रिंट पँट आणि पांढऱ्या रंगाचे टॉप

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

नव्या नवेलीनं स्नेक प्रिंट पँट घातल्याचं आपण फोटोमध्ये पाहू शकता. यावर तिनं पांढऱ्या रंगाचे क्रॉप टॉप मॅच केले होते. टॉपमधील डीप कट नेकलाइनमुळे नव्याला बोल्ड लुक मिळाला आहे. दुसरीकडे ओवरसाइझ्ड लाल रंगाच्या शर्टमुळे तिचा लुक स्टायलिश दिसत आहे.

​लाल रंगावरील विशेष प्रेम

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

नव्याला लाल रंग प्रचंड आवडतो. इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास लाल रंगाच्या कपड्यांमधीलच तिचे कित्येक फोटो तुम्हाला दिसतील. या फोटोमध्येही लाल रंगाच्या पोषाखातील दोन हटके लुक आपण पाहू शकता. एका फोटोमध्ये तिनं लिनन मेड सैल शर्ट लुक तर दुसऱ्या फोटोमध्ये स्टायलिश वी-नेक टॉप आणि स्कर्ट परिधान केल्याचं दिसतंय. दोन्ही पोषाखांमध्ये ती सुंदरच दिसतेय.

​टोंड बॉडी केली फ्लाँट

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

श्वेता नंदाची लाडकी लेक आपल्या फिटनेसही पुरेपूर काळजी घेते. यामुळेच तिचं शरीर फिट आणि टोंड आहे. आपली शानदार फिगर ती अधे-मधे फ्लाँट सुद्धा करत असते. या फोटोमध्ये नव्याने ब्रालेट स्टाइल पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपसह हाय राइज जीन्स आणि जॅकेट परिधान करून टोंड फिगर फ्लाँट केल्याचं दिसतंय.

​नव्याचा आकर्षक लुक

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

आउटफिटमध्ये हॉट व बोल्ड टच कसा द्यायचा, हे अभिनेत्रीला चांगलंच ठाऊक आहे. या फोटोमध्ये तिनं क्लासिक पांढऱ्या रंगाचा शर्ट, स्लिमफिट करड्या रंगाची जीन्स, लेदर जॅकेट आणि बूट्स परिधान केल्याचं आपण पाहू शकता. यावर तिनं मल्टीलेअर नेकलेस घातलं होतं.

​गुलाबी रंगाचा टॉप आणि शॉर्ट्समधील सुंदर लुक

अमिताभ बच्चन यांच्या नातीने शेअर केला मोहक व सुंदर फोटो, स्टायलिश लुकसमोर सिनेतारकाही फिक्या

नव्या कोणत्याही पॅटर्नच्या आउटफिटमध्ये सुंदरच दिसते. या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाचा सुंदर लेअर्ड टॉप परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड मोहक दिसतेय. परफेक्ट व आकर्षक लुक मिळावा यासाठी तिनं कानात गोल्डन हूप्स घातले होते. या फोटोमध्ये ती गोंडस दिसतेय.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW