Sunday, July 25, 2021
HomeमनोरंजनAnushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party...

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party – एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

अभिनेत्री म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अवर्णनीय सौंदर्य. चंदेरी दुनियेतील नट्यांचं ब्युटी सिक्रेट, त्यांचं लाइफ स्टाइल बहुतांशा तरुणी फॉलो करतात. फॅशनच्याबाबतीत सोनम कपूर, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण सारख्या अनेक अभिनेत्री टॉपला आहेत. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचंही नाव आवर्जून घेतलं जातं. अनुष्का तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अगदी बिनधास्त आहे. फॅशनच्या बाबतीत तर तिचा हात कोणी धरूच शकत नाही. ट्रोलिंग किंवा आपल्यावर होणाऱ्या टिकेचा विचार न करता आपल्या आवडीचे कपडे अनुष्का परिधान करते.

तिचे स्टायलिश अवतारामधील फोटो पाहून नेटकरीही हैराण होतात. वेस्टर्न असो वा पारंपरिक प्रत्येक लुकमध्ये ही अभिनेत्री अगदी मोहक आणि सुंदर दिसते. आपल्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री चक्क आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नाच्या पार्टीमध्ये पोहचली. अगदी नटून-थटून स्टायलिश अवतारामध्ये अनुष्का या पार्टीमध्ये पोहोचताच साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिचा हा स्टायलिश लुक नेमका कसा होता यावर एक नजर टाकुया.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स, इन्स्टाग्राम @anushka sharma, falgunishanepeacockindia)

​एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

कलाकार मंडळींचं खाजगी आयुष्य आणि त्यांचं रिलेनशिप इतरांपासून काही लपून राहिलेलं नाही. अनुष्का शर्माच्या बाबतीतही अगदी असंच काहीसं घडलं. क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी अभिनेता रणवीर सिंग आणि अनुष्का एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर काही कारणास्तव हे दोघं विभक्त झाले. एका चॅट शोदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणला मैत्रिण म्हणून स्वीकारू शकत नसल्याचं अनुष्काने कबुल केलं होतं. मात्र २०१८ मध्ये दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनुष्काला पाहताच साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. यावेळी ती खूप मोहक आणि सुंदर दिसत होती.

(दिराच्या लग्नात नटून-थटून पोहोचली जेनेलिया डिसुझा, नवरीला सोडून तिच्यावरच खिळल्या साऱ्यांच्या नजरा)

​ग्लॅमरस बॉडी हगिंग गाउन

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

अनुष्काला फॅशनच्याबाबतीत सारं काही परफेक्ट लागतं. पारंपरिक बरोबरच वेस्टर्न लुकमध्येही अनुष्का अगदी ग्लॅमरस आणि मोहक दिसते. तिच्या प्रत्येक फोटोकडे पाहून ते लक्षात येतंच. दीपिका-रणवीरच्या रिसेप्शन पार्टीसाठी देखील अनुष्काने ग्लॅमरस डिझायनर गाउनची निवड केली होती. डिझायनर फाल्गुनी शेन पिकॉकने हा ग्लॅमरस गाउन डिझाइन केला होता. या गाउनची बॉडी-हगिंग डिझाइन अनुष्कावर अगदी उठून दिसत होती. तसेच या लेव्हेंडर रंगाच्या गाउनमधील तिची हॉट फिगर आणि फिटनेस पाहून साऱ्यांच्या भूवया उंचावल्या.

(अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात)

क्रिस्टल वर्क टच

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

रेड कार्पेट असो वा एखादा कार्यक्रम अनुष्का डिझायनर ड्रेस परिधान करण्यास अधिक प्राधान्य देते. आपला प्रत्येक लुक परफेक्ट कसा दिसेल यासाठी ती धडपड करत असते. आजवर आपण अनुष्काला वेगवेगळ्या लुकमध्ये पाहिलं आहे. प्रत्येक आउटफिटमध्ये ती तितकीच आकर्षक दिसते. या गाउनमध्येही अनुष्का भलतीच गोड दिसत होती. हा फ्लोर लेन्थ गाउनला हायनेकची जोड देण्यात आली होती. यासाठी शीअर मटेरियलचा वापर करण्यात आला होता. तसेच या गाउनला जिओमॅट्रिक पॅटर्न टच देण्यात आला होता. तसेच या गाउनवर क्रिस्टल वर्क करण्यात आलं होतं.

(सोनमच्या ‘या’ लुकवर झाली होती टीका, नोरानंही घातले तसेच बोल्ड आउटफिट! कोण दिसतंय स्टायलिश?)

​फेदर वर्कची चर्चा

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

अनुष्काचा गाउन आणि तिचा लुक या पार्टीमध्ये साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. अनेक हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींनी या रिसेप्शन पार्टीसाठी हजेरी लावली होती. मात्र या सगळ्या अभिनेत्रींना अनुष्का लुकच्याबाबतीत तगडी टक्कर देत होती. फेदर वर्कमुळे अनुष्काच्या गाउनला चांगला लुक आला होता. गाउनच्या फुल स्लिव्हजला फेदर लुक टच डिझायनरने दिला होता. तसेच गाउनची टेल डिझाइन मुख्य आकर्षण ठरली. एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीसाठी अनुष्काने निवडलेला हा गाउन आणि या गाउनमधील तिचे फोटो सोशल मीडियावरही बरेच व्हायरल झाले होते.

(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)

असा होता मेकअप

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

अनुष्काला अगदी नॅचरल आणि साधं राहायला आवडतं. साधेपणा हेच तिच्या सौंदर्यामागील मोठं रहस्य आहे. अनुष्का तिच्या प्रत्येक ड्रेसला साजेसा असा मेकअप करते. यावेळी देखील तिने तिच्या मेकअपकडे विशेष लक्ष दिलं होतं. तिने लाइट टोन आणि ग्लॉसी मेकअप केला होता. तसेच लाइट स्मोकी आइज, लाइट शेड लिपस्टिक, आयलायनर, आयशॅडो असा अनुष्काचा मेकअप होता. तिची हेअरस्टाइल देखील अगदी साधी होती. मिडल पार्टेट हेअरस्टाइल ठेवत तिने पोनी बांधणं पसंत केलं.

(करीना कपूरनं भावाच्या वरातीसाठी निवडला हॉट व बोल्ड साडी लुक, लोकांची नजर तिच्यावरच राहिली खिळून)

​मॅचिंग इयररिंग्स

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times

डिझायनर गाउन परिधान करताना अनुष्काने तिच्या दागिन्यांकडेही विशेष लक्ष दिलं होतं. भरगच्च गाउनवर तिने कमी दागिने परिधान करण्याकडे भर दिला होता. अनुष्काने शॅण्डलियर इयररिंग्स घातले होते. हे इयररिंग्स चमकदार खड्यांनी तयार करण्यात आले होते. AS Motiwala Fine Jewellery चे कानातले घालणं अनुष्काने पसंत केलं होतं. तसेच खड्यांची अंगठी देखील तिने घातली होती. अनुष्का या लुकमध्ये अगदी परफेक्ट दिसत होती. तिचा हा लुक अनेक दिवस बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

(करिश्मा कपूरने बिकिनी घालून साजरा केला वाढदिवस, बोल्ड लुक पाहून चाहते झाले होते घायाळ)Source link

Anushka Sharma Wore Bold And Glamorous Gown For Ranveer Singh Reception Party - एक्स बॉयफ्रेंडच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचली अनुष्का शर्मा, अभिनेत्रीच्या बॉडी फिटिंग गाउनकडेच खिळल्या साऱ्यांच्या नजरा | Maharashtra Times
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News