MLA Ram Satpute: भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी आमदार राम सातपुते यांची नियुक्ती

0
46

प्रमोद परदेशी – प्रदेश प्रसिद्धी प्रमुख: भाजप भटके विमुक्त आघाडी, महाराष्ट्र

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय (BJYM) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या (BJYM President MP Tejasvi Surya) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. बुधवार, १४ जुलै रोजी ही घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय महामंत्री, तर सात राष्ट्रीय सचिव यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, मीडिया प्रभारी, सोशल मीडिया प्रभारी, तसेच पॉलिसी रिसर्च, या पदांवर प्रत्येकी एका व्यक्तीची नियुक्ती केली गेली आहे.

कोण आहेत राम सातपुते?

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्याा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा ते थेट आमदार असा त्यांचा थरारक प्रवास आहे. अवघ्या 30 व्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव करून ते थेट विधानसभेत पोहोचले आहेत. राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे.

दुष्काळी गाव, वडील ऊसतोड कामगार

सातपुते हे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी भागातील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ गाव बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रोडवरील डोईठाण हे आहे. त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे शंकर सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार होते. त्यांची आई जिजाबाई या सुद्धा शेतता मोलमजुरी करायच्या. 1990 ते 1995 ही पाच वर्षे विठ्ठल सातपुते यांनी या साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीचे काम केले होते. परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं. राम यांनी पुण्यात राहून मुद्रण तंत्र पदविका आणि पदवीचे शिक्षण घेतलं आहे. विठ्ठल सातपुते आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात.

ABVP विद्यार्थी चळवळीतून राजकारणास सुरुवात

पुण्यात असतानाच राम सातपुते हे अभाविपच्या संपर्कात आले होते. अभाविपच्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सातत्याने भाग घेतला. काही आंदोलनाचं नेतृत्वही केलं. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या युवा मोर्चाचे अध्यक्षपद आलं. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवादावर त्यांनी अनेक शहरात जाऊन त्यांची भूमिका मांडली होती.

आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.