Monday, June 21, 2021
Homeक्रीडाATM मधून पैसे काढणं आता होणार महाग, दरामध्ये वाढ करण्याची RBI ची...

ATM मधून पैसे काढणं आता होणार महाग, दरामध्ये वाढ करण्याची RBI ची परवानगी

आता बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं महाग होणार असून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्जेक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

सध्या बॅंकाकडून ग्राहकांना पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येतात. त्यामध्ये जर वाढ झाली तर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता या कस्टमर चार्जमध्ये एका रुपयाची वाढ करण्यात आली असून तो 21 रुपये इतका करण्यात आला आहे. आरबीआयने हा चार्ज आता नवीन चार्ज कॅश रीसायक्लिंग मशिनवरही लावला आहे. हा नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहे.

आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक ट्रान्जेक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे. आर्थिक ट्रान्जेक्शन म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे होय तर गैर आर्थिक ट्रान्जेक्शन म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामं होय.

सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्जेक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येत आहेत. त्यावरील ट्रान्जेक्शनवर पैसे आकारण्यात येतात. जून 2019 साली आरबीआयने इंडियन बँक असोसिएशनचीच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW