Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाBCCI च्या घोषणेनंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या तयारीला सुरुवात, कर्नाटक क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर...

BCCI च्या घोषणेनंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या तयारीला सुरुवात, कर्नाटक क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर ठेवली ‘ही’ अट | After BCCI Announced New Season Of Domestic Cricket Karnataka State Cricket Association Orders Players to take Covid 19 Vaccineकाही दिवसांपूर्वीच BCCI ने यंदाच्या वर्षांतील स्थानिक क्रिकेट स्पर्धांबाबत मोठी घोषणा केली. सर्व स्पर्धांचे वेळापत्रक प्रसिद्ध करत रणजी चषकासह स्थानिक स्पर्धांबाबत मोठा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व राज्याचे क्रिकेट संघ स्पर्धांच्या तयारीला लागले आहेत.

BCCI च्या घोषणेनंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या तयारीला सुरुवात, कर्नाटक क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर ठेवली 'ही' अट

कर्नाटक रणजी संघ

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी रणजी क्रिकेट स्पर्धा अनेक दशकानंतर रद्द करण्यात आली होती. काही ठरावीक स्पर्धाच घेण्यात आल्या ज्यामुळे अनेक स्थानिक स्पर्धा रद्द झाल्या. ज्यामुळे स्थानिक खेळाडू आणि संघाचेही नुकसान झाले मात्र यंदा कोरोनाबाबत सर्व काळजी घेऊन स्थानिक क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याची माहिती  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिली. बीसीसीआयने 2021-22 या वर्षांत खेळवल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रकही जाहिर केले.  त्यानंतर आता सर्व राज्याचे क्रिकेट संघ स्पर्धांच्या तयारीला लागले असून कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (KSCA) ही तयारीला लागला आहे. दरम्यान त्यांनी आपल्या खेळाडूंसमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहे.

कर्नाटक क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सर्व खेळाडूंना यंदाचे क्रिकेट वर्ष सुरु होण्यापूर्वी कोरोना लशीचा किमान एक डोस घेणे अनिवार्य केले आहे. क्रिकट्रॅकरच्या रिपोर्टनुसार बँगलोर मिररकडून समोर आलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने त्यांच्या 18 वर्षावरील खेळाडूंना स्पर्धेत शामिल होण्यापूर्वी कोरोना लशीचा किमान एक डोस घेणे बंधनकारक केले आहे. क्रिकेट संघाने क्रिकेटर्ससाठी वॅक्सीन कॅम्प देखील आयोजित केले आहेत.

वर्षभरात 2000 हून अधिक सामने

बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून 2 हजार 127 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिनाभर विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा चालेल.

अशा पार पडती स्पर्धा

21 सप्टेंबर 2021: सीनियर महिला वनडे लीग

27 ऑक्टोबर, 2021: सीनियर महिला वनडे चँलेंजर ट्रॉफी

20 ऑक्टोबर – 12 नोव्हेंबर 2021 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

16 नोव्हेंबर 2021- 19 फेब्रुवारी 2022: रणजी ट्रॉफी

23 फेब्रुवारी 2022- 26 मार्च 2022: विजय हजारे ट्रॉफी

हे ही वाचा :

मिताली पाठोपाठ ‘या’ महिला भारतीय गोलंदाचाही विश्वविक्रम, तब्बल 2000 हून अधिक ओव्हर टाकणारी पहिली महिला गोलंदाज

भारतीय क्रिकेटपटूंच टाईट शेड्युल, वर्षभरात तब्बल 2127 सामने खेळणार

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(After BCCI Announced New Season Of Domestic Cricket Karnataka State Cricket Association Orders Players to take Covid 19 Vaccine)Source link

BCCI च्या घोषणेनंतर स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या तयारीला सुरुवात, कर्नाटक क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर ठेवली 'ही' अट | After BCCI Announced New Season Of Domestic Cricket Karnataka State Cricket Association Orders Players to take Covid 19 Vaccine
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News