राज्याचे गृहखात्येच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्याचं काय ?

5
58

मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

सभाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून आणि पोलीस दलातील महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर वळसे-पाटलांशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं. तसेच महिला अत्याचार रोखण्यासंदर्भातील निवेदनही दिलं. राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलीस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. यावेळी त्यांनी कोणत्या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाला त्याची माहितीही दिली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या,” महाराष्ट्रात लहान मुली महिलांसोबतचं पोलिसदलात काम करणाऱ्या महिला पोलिस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरताहेत जो अतिशय गंभीर व चिंतेचा विषय आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत चर्चा करत निवेदन दिले. रक्षणकर्त्यांच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचं काय?” हा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यात महिला पोलिसांबाबत घडलेल्या काही घटनांचा हवाला दिला.तसेच राज्यातील महिला आणि मुली सुरक्षित नसताना ज्यांच्यावर यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्या महिला पोलिसही आज सुरक्षित नाहीत, अशावेळी राज्यातील सर्वसामान्य महिलांनी व मुलींनी जायचे कुठे ?या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याबाबतचे निवेदन गृहमंत्र्यांना दिल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी २ जून रोजी चित्रा वाघ यांनी रेल्वेमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांसदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी केली आणि सद्यस्थितीमधील सुरक्षेचा आढावा घेतला.महिल्यांच्या डब्यामध्ये सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची वेळ रात्री ९ ते सकाळी ६ आहे ती सध्याच्या कोरोना काळात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ करावी. दोन्ही घटनेत आरोपी पकडले गेले आहेत. मात्र, त्यासोबत कर्तव्यामध्ये हलगर्जीपण करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी वाघ यांनी यावेळी केली. तसेच विद्या पाटील यांच्या परिवाराला आणि लोणंद घटनेतील वाचलेल्या मुलीला रेल्वेकडून आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील महिला सुरक्षेसंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रत्येक महिला कोचमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू असून आतापर्यंत २०० लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या तीन आणि मध्य रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये आपत्कालीन फोन आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले असून सध्या त्यांची चाचणी सुरू आहे.