Atul Bhatkhalkar: कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सुचवा; भातखळकरांचा टोला

0
20
मुंबई: शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दोन्ही पक्षांमध्ये वार आणि पलटवारही पाहायला मिळत आहेत. आज योग दिनाचे औचित्य साधत भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेचे भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा, असा टोला भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (bjp mla atul bhatkhalkar criticizes cm uddhav thackeray)

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना भाजपने शवासन करावे असा टोला लगावला होता. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. हे लक्षात घेता आपण भाजपसाठी कोणते आसन सूचवाल?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांना केला होता. त्यावर ‘शवासन’ असे उत्तर राऊत यांनी दिले होते. त्यावर भातखळकर यांनी हा पलटवार केला आहे.अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या घरी राहून काम करण्यावर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला ‘घरबशा कारभार’ असा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातील स्मशाने अखंड धगधगत आहेत. त्यामुळे मेंदू तल्लख करेल आणि कार्यक्षमता निर्माण करेल असे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा असे भातखळकर यांनी म्हटले आहे. भातखळकर आपल्या म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे.’

Source link