Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाBJP MP Pragya Thakur Said People Call Hemant Karkare A Patriot But...

BJP MP Pragya Thakur Said People Call Hemant Karkare A Patriot But Real Patriots Dont Call Him One


भोपाळ : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. 

यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात की, “हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला.”

देशात एक आणिबाणी 1975 साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही 2008 साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं हेमंत करकरे यांनी तोडल्याचंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं. 

 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या 2008 साली मालेगावात झालेल्या स्फोटातील एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत त्यांची चौकशी केली होती. 

दरम्यान,आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं होतं. 

महत्वाच्या बातम्या : 

Source link

BJP MP Pragya Thakur Said People Call Hemant Karkare A Patriot But Real Patriots Dont Call Him One
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News