Tuesday, June 22, 2021
Homeमहाराष्ट्रMumbai Guidelines: मुंबईत लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी; 'हे' आहेत नवे नियम

Mumbai Guidelines: मुंबईत लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी; ‘हे’ आहेत नवे नियम

मुंबई (वृत्तसंस्था) | शासननामा न्यूज ऑनलाईन

करोना नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील इतर शहरांच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. या पार्श्वभूमीवर ‘तिसऱ्या गटा’त मोडणाऱ्या मुंबई महापालिकेने मुंबईसाठी शनिवारी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये दुकाने, हॉटेल दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉल, चित्रपटगृहे, सभागृहे आणि नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवार आणि सायंकाळी पाचनंतरची संचारबंदी कायम राहणार आहे.

मुंबईत करोना नियंत्रणात आला असला, तरी चाचण्यांच्या प्रमाणात असणारा पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असल्याने मुंबईचा समावेश ‘तिसऱ्या गटा’त झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर;तर इतर सर्व प्रकारची दुकाने शनिवार-रविवार वगळून सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू ठेवता येणार आहे. शनिवार-रविवार याला बंदी असेल.

लोकलप्रवासाचा निर्णय पालिकाच घेणार

लोकलप्रवासाची सुविधा केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांनाच राहणार असून, महिलांनाही सरसकट प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. लोकलप्रवासाबाबतचे अधिकार पालिकेलाच असल्यामुळे पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआर) लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसारच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. ‘बेस्ट’मध्ये मात्र १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, उभ्याने प्रवास करता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दिवसभर गोंधळ

मुंबई नेमक्या कोणत्या गटात मोडते यावरून शनिवारी दिवसभर गोंधळ होता. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार मुंबई तिसऱ्या गटात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या निकषांनुसार आणि नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातही गोंधळाचे वातारण

ठाणे : राज्य सरकारने राज्यातील शहरांच्या निर्बंधांमध्ये शिथिलतेचेआदेश जारी केल्यानंतरही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शनिवारी उशिरापर्यंत कोणत्याही सूचना जारी करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यातील ठाण्यासह, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, मिरा-भाईंदर महापालिका जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

– कलावंतांसह संबंधित इतर लोक एकाच ठिकाणी राहाणाऱ्या (बायो बबल) चित्रीकरणाला परवानगी. मात्र, संध्याकाळी पाचनंतर फक्त इनडोअर शूटिंग.

-उत्पादने निर्यात होणाऱ्या लघु व मध्यम उद्योग, अत्यावश्यक सेवा, देशाच्या सुरक्षेशी संबधित उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी.

– निर्यात होणारी उत्पादने, अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित उद्योगांना ५० टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी. मात्र, कर्मचारी-कामगारांची वाहतूक स्वत: करायची आहे.

– सरकारी व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती. शनिवार-रविवार वगळून संध्याकाळी चार वाजेपर्यंत.

– सांस्कृतिक, सामाजिक करमणूक कार्यक्रम क्षमतेच्या ५० टक्के संध्याकाळी चारपर्यंत. शनिवार, रविवार बंदी.

– जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के उपस्थितीत दुपारी चारपर्यंत सुरू. एसीला बंदी.

– पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग आणि मॉर्निंग वॉकला परवानगी

– मैदानी खेळ – पहाटे ५ ते सकाळी ९, संध्याकाळी ६ ते रात्री ९

– लग्नसमारंभ – ५० व्यक्तींची उपस्थिती, दोन तासांची अट रद्द.

– सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत ४ वाजेपर्यंत.

– बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असल्यास किंवा बाहेरून कामगार आल्यास संध्याकाळी चारपर्यंत

– अंत्ययात्रा – २० माणसांची उपस्थिती.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW