Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनसामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी...

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे रोखण्यासाठी व तिस-या लाटेला आळा घालण्यासाठी देशात सर्वत्र लसीकरणाची प्रक्रिया आता तीव्र करण्यात आली आहे. योग दिनापासून म्हणजे 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लस मिळू लागली आहे. काही लोकांच्या मनात लसी संदर्भात विविध भितीदायक प्रश्न असतानाच बहुतांश लोक मोठ्या प्रमाणात दररोज लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. आरोग्यतज्ञ कोविड विरूद्ध लस 100% प्रभावी असल्याचे सांगत आहेत आणि करोनाची दुसरी लाट ओसरणं हेच त्याचा परिणाम आहे.

पण लस लावताना काही गोष्टींची काळजी घेणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपण लसीकरणाच्या दिवशीच नेमके आजारी पडलात तर आपण लस घ्यावी की नाही? या लेखात आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया आणि आपल्या मनात असलेल्या शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न देखील करुयात.

व्हायरल इनफेक्शनमुळे गोंधळतो रुग्ण

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

पावसाळ्यात लोक बर्‍याचदा कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला बळी पडतात आणि त्यातून सावरण्यास थोडा वेळ लागू शकतो. अशावेळी आजारी व्यक्तीची सामान्य लक्षणे आणि कोविड -१९च्या संसर्गाच्या लक्षणांमधे फरक ओळखताना पूर्णपणे गोंधळ उडू शकतो. यावेळी रुग्णाला समजतच नाही की आपल्याला करोनाची लागण झाली आहे की सामान्य संसर्ग आहे. अशा स्थितीत ती व्यक्ती गोंधळते की लस घेणं सुरक्षित आहे की नाही? आजारपणाl लस घेतल्यास त्याचा काही परिणाम होईल की नाही?

लस घेण्याआधी या लक्षणांवर द्या लक्ष

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

आरोग्य मंत्रालयाने तसेच जागतिक आरोग्य संस्थांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे कुठेच म्हटले गेले नाहीये की सर्दी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजाराचे लोक लसचा डोस घेऊ शकत नाहीत. पण आरोग्यतज्ञ आणि संसर्गजन्यरोगतज्ञांनी ठामपणे मत व्यक्त केले आहे की व्हायरल इन्फेक्शन किंवा जठरा संबंधित संक्रमण सारख्या मध्यम-गंभीर आजारांच्या बाबतीत लसीकरणाची तारीख पुढे ढकलली तर उत्तम आहे. असेही म्हटले जात आहे की खोकला, ताप यासारख्या लक्षणांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी ही लस घेणे धोकादायक ठरू शकते, कारण कदाचित ते कोविड संक्रमणाने ग्रस्त असू शकतात.

या परिस्थितीत वॅक्सिन घेऊ नये

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

आजारी व्यक्तींसाठी लस कार्यक्षम करू शकत नाहीत याचा कोणताही विश्वासू पुरावा नाहीये. कारण हे देखील रुग्णाला माहित असले पाहिजे की कोणत्याही रोगादरम्यान त्याची रोगप्रतिकारक शक्ती विषाणूचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी कठोर मेहनत घेत असते. म्हणूनच रुग्णाला बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तो अशक्तही होऊ शकतो. अशा परिस्थितीत लसीकरण करणं आणि दुष्परिणाम भोगणं अजिबात शहाणपणाचं लक्षण नाही. कारण लस घेतल्यानंतर आजारपणातील लक्षणं आणि करोना व्हायरसच्या लसीची लक्षणं असा दुहेरी त्रास सहन करणं थोडं कठीण जाऊ शकतं.

लहान आजारात वॅक्सिन घेणं हानीकारक नाही

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आजारपणात आपली रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत झालेली असते आणि अशा परिस्थितीत लस घेणं आरोग्यासाठी योग्य निर्णय असूच शकत नाही. आपल्याला एखादा लहान आजार असल्यास लसीकरण करणे इतके हानिकारक होणार नाही पण एखाद्या गंभीर आजाराचा सामना आणि कोविडसारख्या संसर्गाची त्रासदायक लक्षणे असताना लस घेणं धोकादायक ठरु शकतं.

ही लक्षणं दिसल्यास लस घेऊ नका

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?

सर्दी, खोकला किंवा फक्त डोकेदुखी ही कोविड १९ संसर्गाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत काही दिवसानंतर लस घेणेच चांगले ठरु शकते. कारण अशा परिस्थितीत आपण लस घेतल्यास ते केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीही धोकादायक सिद्ध होऊ शकते. तर ज्यांना कोविड झाला आहे किंवा जे लोक करोनातून नुकतेच बरे झाले आहेत त्यांनी लस घेण्यासाठी ३ ते ४ महिने प्रतीक्षा करावी.

Source link

सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News