can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत ‘या’ भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

0
47


भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट (corona virus) संपुष्टात येत आहे. सर्वच राज्यांनी लॉकडाउन हटवण्यास सुरूवात केली आहे. पण कोरोना व्हायरसच्या डेल्टा (delta variant) आणि डेल्टा प्लस (delta plus variant) या नवीन नवीन व्हेरिएंट्सनी आतापर्यंत बर्‍याच लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असली तरीही कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या नव्या व्हेटिएंट्सनी तिसर्‍या लाटेचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत तिस-या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढवणं गरजेचं आहे.

यासाठी सर्वच हेल्थ एक्सपर्ट्स लोकांना शक्य तितक्या लवकर लस घेण्याचा सल्ला देत आहेत. पण अलीकडेच आलेला अहवाल असे दर्शवत आहे की कोरोनाची डेल्टा आणि डेल्टा प्लस ही रूपे लसीद्वारे तयार केलेल्या रोगप्रतिकारक शक्तीलाही मात देण्यास सक्षम आहेत. चला तर जाणून घेऊया ही माहिती खरी आहे की हा एक गैरसमज आहे.

नेमका काय आहे डेल्टा व्हेरिएंट?

can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटचं नामकरण केलं आहे. सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जातो आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वात आधी भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 पेक्षा जास्त देशांत त्यांचा प्रसार झालेला आहे. डेल्टा व्हेरिएंट कप्पा व्हेरिएंटच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेने 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जवळपास देशातील प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे.

(वाचा :- Yoga For Knee Pain : लठ्ठपणा, गुडघेदुखी, पोट साफ न होणं, निरुत्साह या समस्यांपासून मिळेल कायमची मुक्ती, करा हे ५ मिनिटांचं आसन!)

डेल्टा प्लस आहे अधिक भयंकर

can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

कोरोना विषाणूबद्दल सरकारने अलीकडेच सांगितले आहे की कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. मागील सर्व व्हेरिएंट्सपेक्षा यामध्ये केवळ वेगाने पसरण्याचीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करण्याची आणि फुफ्फुसांना अधिक नुकसान पोहचवण्याची देखील क्षमता आहे. या व्हेरिएंट्सचे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने सर्व राज्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सरकारने या विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी वेळेवर व जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आवाहन सर्व राज्यांतील नागरिकांना केले आहे. शिवाय लसीकरणाची प्रक्रिया जलद करण्याची शिफारस देखील केली आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत एकूण 9 देशांमध्ये सापडला आहे. ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारत व्यतिरिक्त हा प्रकार अमेरिका, ब्रिटन, रशिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ आणि चीन यासारख्या देशांमध्येही आढळला आहे.

(वाचा :- वेट लॉस करणा-यांना करीनाच्या डाएटिशियनचा खास सल्ला, चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊन करू नका दिवसाची सुरूवात!)

वॅक्सिन करू शकते का नव्या व्हेरिएंटवर मात?

can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

पाहायला गेलं तर कोरोना लस त्याच्या पहिल्या व्हेरिएंटनुसार म्हणजेच अल्फा व्हेरिएंट आणि त्याच्या सुरुवातीच्या काही रूपांच्या दृष्टीने तयार केली गेली आहे. अशा परिस्थितीत नवीन आलेल्या व्हेरिएंटचे वैशिष्ट्य म्हणजे ते अँटीबॉडीजला देखील चकवा देऊ शकते. जरी काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर काही लसी काम करतात पण आतापर्यंत डेल्टा प्लस विषाणूबद्दल कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत किंवा तज्ञांनी सुद्धा याबद्दल कोणतेही मत व्यक्त केले नाही.

(वाचा :- Covid19 Delta Plus Variant : करोनाचं अधिक गंभीर रूप असलेल्या डेल्टा व्हेरिएंटने घातलंय थैमान! कोणती वॅक्सिन यावर अधिक प्रभावी?)

वॅक्सिनेशन नंतर देखील होऊ शकता संक्रमित

can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

कोरोना विषाणूच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रकरण राजस्थानच्या बीकानेरमधून आले आहे. डॉक्टर ओ.पी चहर यांनी सांगितले की संसर्ग झालेल्या महिलेचे वय 65 वर्षे आहे. तसेच ती मे महिन्यातच करोना व्हायरसच्या पहिल्या प्रकारातून बरी झाली आहे आणि तिने लसीचे दोन्ही डोसही घेतले आहेत. डॉक्टर म्हणतात की या महिलेच्या रक्ताचे नमुने 30 मे रोजी पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ज्यानंतर त्यांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर असे आढळले की त्यांच्या शरीरात डेल्टा प्लस व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. ही महिला कोविडच्या विळख्यात येऊन आधीच बरी देखील झाली होती. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की लसीकरणाच्या दोन्ही डोसानंतरही एखादी व्यक्ती डेल्टा प्लस व्हेरिएंटचा बळी पडू शकते. जरी या लोकांना यापूर्वी संसर्ग झाला असला तरीही.

(वाचा :- Weight loss diet: महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!)

खबरदारी बाळगणं गरजेचंच

can delta variant infect vaccinated people: Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?

आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोनाची दुसरी लाट नुकतीच बर्‍याच राज्यांत संपुष्टात आली आहे पण याचा अर्थ असा मुळीच नाही की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करावा. अशा परिस्थितीत या विषाणूपासून दूर राहण्यासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे या प्राणघातक विषाणूचा संसर्ग टाळता येऊ शकतो. यासोबतच तज्ञ लोकांनी लसीकरण करण्याचा सल्लाही देत आहेतच. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही लसी या विषाणूच्या डेल्टा रूपांवर देखील कार्य करतात. म्हणून सावधगिरी बाळगा, डबल मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा. ही खबरदारी घेऊनच आपण कोविडपासून दूर राहू शकता.

(वाचा :- Guillain Barre Syndrome Covid लस घेतलेल्या लोकांमध्ये आढळताहेत ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, अशी झालीय रुग्णांची अवस्था)Source link