Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रcar accident in Aurangabad: Car accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक;...

car accident in Aurangabad: Car accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक; प्रवासी जखमी.. मोठा अनर्थ टळला – car acident in aurangabad no casualty reported


हायलाइट्स:

  • आकाशवाणी कडून सिडको चौकाकडे जाणारी भरधाव कार सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढून अपघात झाला.
  • पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला हुलकावणी दिली.
  • ही घटना मंगळवारी (२९ जुन) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.

औरंगाबाद: आकाशवाणी कडून सिडको चौकाकडे जाणारी भरधाव कार सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढून अपघात झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुन) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. (car acident in aurangabad no casualty reported)

या घटनेबाबत कार मालक अरुण टेकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ सुनील टेकाळे आणि मुलगा अथर्व टेकाळे (१८, एसबीओए शाळेसमोर नंदादीप हाऊसिंग सोसायटी) हे औरंगपुरा येथून सिडको बस स्थानक चौकाकडे त्यांची कार क्रमांक एमएच २० ईजे ९६१३ खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा डबा आणण्यासाठी जात होते. आकाशवाणी कडून सेवन हिल उड्डाण पुलावर कार येताच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिली. यावेळी सुनील टेकाळे हे कार चालवत होते.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या गणेशमूर्तींनाच परवानगी

ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे टेकाळे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. उड्डाणपुलावरील दुभाजकावर कार अंदाजे ५० मीटर अंतरापर्यंत पुढे गेली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेकाळे चालवत असलेल्या कारची गती देखील जास्त होती.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाच्या नियमावलीवर आशीष शेलार यांचे टीकास्त्र; पुनर्विचार करण्याचे केले आवाहन

अपघाताची माहिती कळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चव्हाण, अवध सोंगकलंगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी कोणताही गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात आज ८,०८५ नवे करोना रुग्ण; ८,६२३ झाले बरे, तर मृ्त्यू २३१Source link

car accident in Aurangabad: Car accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक; प्रवासी जखमी.. मोठा अनर्थ टळला - car acident in aurangabad no casualty reported
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News