छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
81

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जुलै रोजी कोरोना प्रतिबंधात्मक प्रशासकीय सर्व नियम व अटींचे पालन करत श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य, व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने मंत्री हाऊस, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सध्या कोरोनाचा कहर कमी होत चालला असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. ब्लड बँकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन छावा स्वराज्य सेनेच्यावतीने हा रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला.

छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामघायतिडक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

या शिबिरासाठी छावा स्वराज्य सेना संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील), प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख, प्रदेश महिला अध्यक्षा शीतल हुलावळे, प्रदेश संघटक विवेक अत्रे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागेश जाधव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुषमा यादव, अॅड. चित्रा जानगुडे, अॅड. धनश्री बोराडे, जया बांदल, मेघा कदम, अॅड. सुषमा नामदास, पूजा कांबळे, पुणे शहर अध्यक्ष गणेश कांबळे पि. चि. शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष सुशांत जाधव, पि. चिं. युवा शहर अध्यक्ष अनिकेत बेळगावकर, प्रहार पक्षाचे नयन पुजारी, शुभम शहा, नीलेश दोडके, अजय गाडवे, किशोर अटरगेकर, एजाज शेख, प्रतिक पडवळ, समर्थ नरळकर, राकेश कांडगे तसेच अक्षय ब्लड बँकचे सर्वेसर्वा संजय शिंदे, भूषण सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.