Thursday, June 17, 2021
Homeपुणेचंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका | Pune

चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका | Pune

पुणे, 10 जून: (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि विरोधी पक्षात असलेल्या भाजप (BJP) यांच्यात एक प्रकारचं कोल्ड वॉर सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता मुसळधार पावसानंतर मुंबईची (heavy rain in Mumbai) तुंबई झाल्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईकर सेनेला धडा शिकवतील

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, “गेली 20 वर्षांहून अधिक कालावधी मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता आहे. दीड वर्ष झाले राज्यातही सत्ता आहे. 40 हजार कोटींचं बजेट असतं, 58 हजार कोटींच्या एफडी आहेत पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. किती जण मुंबईतील पावसात मॅनहोलमध्ये पडतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर जो काही धडा शिकवायचा आहेत ते शिवसेनेला शिकवतील.”

प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर आपण टिप्पणी करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनावर प्रतिक्रिया दिली आहे.

जंगलातील वाघाशी मैत्री होते पिंजऱ्यातील नाही 

संजय राऊत यांनी मला मनाविरुद्ध का होईना शुभेच्छा दिल्या आहेत. आठवड्यातील सात दिवसांपैकी एक अग्रलेख माझ्यावर असतो. काल मी एका कार्यक्रमात असताना मला एक पुस्तक आणि एक वाघ दिला. तर मी म्हटलं फार चांगलं झालं वाघांशी तर आमची दोस्ती आहे. मग शिवसेनेचं काय असा प्रश्न मलाा विचारला त्यावर मी म्हटलं, आम्ही दोस्ती करण्यासाठी तयार आहोत. आम्ही जंगलात असताना वाघाशी दोस्ती करतो पिंजऱ्यात असलेल्या नाही. आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते पिंजऱ्यातील नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW