Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रchhagan bhujbal: Third Wave Could Be More Destructive Than The Second Wave...

chhagan bhujbal: Third Wave Could Be More Destructive Than The Second Wave Says Chhagan Bhujbal – Chhagan Bhujbal: तिसरी लाट अधिक विध्वंसक असू शकते; ‘डेल्टा प्लस’बाबत भुजबळ म्हणाले… | Maharashtra Times


हायलाइट्स:

  • ‘डेल्टा प्लस’ या नवीन विषाणूला हलक्यात घेऊ नये.
  • संभाव्य तिसरी लाट अधिक विध्वंसक असू शकते.
  • पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणेला केले सावध.

नाशिक: नाशिक जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी देशामध्ये आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस‘ या करोनाच्या नवीन विषाणूला हलक्यात घेऊ नये. योग्य वेळी नियम पाळून रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर दुसऱ्या लाटेपेक्षा संभाव्य तिसरी लाट अधिक विध्वंसक असू शकते. सलग तीन दिवसांपासून करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागली आहे. परिणामी, जिल्ह्यात सर्व निर्बंध ‘जैसे थे’च राहतील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. ( Chhagan Bhujbal On Covid Third Wave )

वाचा: OBC आरक्षणावरून खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमनेसामने

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या करोना आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, केंद्राच्या सल्लागार समितीनेही राज्य सरकारला ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या बाबतीत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री टाळून चालणार नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकाकारी सूरज मांढरे म्हणाले की, सुदैवाने नाशिकमध्ये अद्याप ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळले नाहीत. तरीही, दक्षता म्हणून पाच टक्के नमुनेदेखील जीनोम सीक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याशिवाय सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत असून, ही बाब चिंता वाढविणारी आहे. यामुळे सध्या तरी कोणतेही निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. नागरिकांनीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटनासाठी फिरू नये. दुपारी चार वाजेनंतर संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे आदी ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.

वाचा: धोका पत्करू नका!; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश

ऑक्सिजन निर्मितीला चालना

जिल्हा ऑक्सिजन साठ्याबाबत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावेत. त्याचप्रमाणे रुग्णालयात खाटांची उपलब्धता, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधसाठा या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्राची माहिती सादर केली.

वाचा: सांगली पालिका हद्दीत अचानक रुग्णवाढ; जिल्हाधिकारी उचलणार कठोर पाऊलSource link

chhagan bhujbal: Third Wave Could Be More Destructive Than The Second Wave Says Chhagan Bhujbal - Chhagan Bhujbal: तिसरी लाट अधिक विध्वंसक असू शकते; 'डेल्टा प्लस'बाबत भुजबळ म्हणाले... | Maharashtra Times
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News