Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाCopa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय,...

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO | In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Wonमेस्सी कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने बोलिवियावर 4-1 च्या दमदार फरकाने विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटीना पुढील फेरीत पोहचली असून सामन्यातील दोन गोल हे एकट्या मेस्सीने केले.

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO

गोल केल्यानंतर सहखेळाडूंसोबत आनंद व्यक्त करताना मेस्सी

ब्राझीलिया : अमेरिकी देशांत सुरु असलेल्या कोपा अमेरिका चषक स्पर्धेत (Copa America Cup) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने (Argentina) आपली अप्रतिम कामगिरी कायम ठेवत बोलिविया (Bolivia) संघावर 4-1 च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तिकडे युरो चषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल (Portugal) संघ स्पर्धेतून बाहेर गेल्याने रोनाल्डोचा खेळ पाहायला मिळणार नाही. मात्र कोपा अमेरिका स्पर्धेत मेस्सीची जादू कायम असून बोलविया विरुद्धही मेस्सीने दोन गोल दागल्याने अर्जेंटीनाने विजय मिळवला.

कायम म्हटले जाते की फुटबॉल हा एक सांघिक खेळ असून सर्व खेळाडूंच्या चांगल्या खेळानेच सामन्यात विजय मिळवता येतो. हे शत प्रतिशत खरे असले तरी एक उत्कृष्ठ खेळाडूही संघाचे भवितव्य बदलू शकतो हेही तितकेच खरे आहे. याची काही उदाहरण म्हणजे रोनाल्डो, मेस्सी, ल्युका मॉर्डीच. त्यात मॉर्डीचचा संघ क्रोएशिया आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल युरो चषकातून बाहेर गेले असले तरी मेस्सीचा अर्जेंटीना अजूनही कोपो अमेरिका खेळत असल्याने अनेक फुटबॉल प्रेमींचे लक्ष अर्जेंटीनाच्या सामन्यांवर लागून आहे.

मेसीची जादू आणि अर्जेंटीना विजयी

अर्जेंटीना आणि बोलिविया यांच्यात झालेल्या सामन्यात सुरुवातीपासूनच अर्जेंटीना संघाचे वर्चस्व होते. सामना सुरु होताच 5 व्या मिनिटाला मेस्सीच्या असिस्टवर गोम्स याने अप्रतिम गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 34 व्या मिनिटाला अर्जेंटीनाला मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने अप्रतिम गोल केला. त्यानंतर लगेचच 41 व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा आपला जलवा दाखवत उत्कृष्ट गोल करत सामन्यात 3-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर 59 व्या मिनिटाला बोलिवियाच्या सेवेड्रोने एक गल केला. मात्र 5 मिनिटांतच अर्जेंटीनाच्या मार्टीनेजने आणखी एक गोल करत संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला.

क्वाॉर्टर फायनलमध्ये इक्वाडोरशी लढत

या विजयापूर्वीच अर्जेंटीनाचा संघ क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे बोलिविया विरुद्धचा विजयाने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आता अर्जेंटीनाची लढत क्वॉर्टर फायनलमध्ये इक्वाडोर संघाशी होणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

Lionel Messi Birthday : दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won)

Source link

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO | In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News