Corona in kolhapur: करोना: कोल्हापूर जिल्ह्यावरील संकट कायम; मृत्यूसंख्याही वाढतीच – corona crisis persists in kolhapur district the death toll continues to rise

0
27


हायलाइट्स:

  • राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत असताना कोल्हापूर जिल्हयातील संकट मात्र कायम आहे.
  • शुक्रवारी तब्बल २१२५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
  • करोना बाधितांचा मृत्यूचा आकडाही कमी होत नसल्याने प्रशासनही अस्वस्थ झाले आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत असताना कोल्हापूर जिल्हयातील संकट मात्र कायम आहे. शुक्रवारी तब्बल २१२५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, करोना बाधितांचा मृत्यूचा आकडाही कमी होत नसल्याने प्रशासनही अस्वस्थ झाले आहे.

मुंबई, पुणे यासह राज्यातील बहुसंख्य शहरातील करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. पण सात जिल्ह्यात हा कहर कायम आहे. यामध्ये कोल्हापुर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर कमी होत असला तरी बाधितांची संख्या मात्र वाढतच आहे. दोन महिन्यात केवळ एकच दिवस बाधितांचा आकडा हजाराच्या खाली आला होता. इतर दिवशी रोज हजार ते दीड हजारापर्यंत हा आकडा कायम आहे. गुरूवारी सतराशेपेक्षा हा आकडा अधिक होता. शुक्रवारी तर तो थेट दोन हजारावर पोहोचला. दिवसभरात २१२५ लोकांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने भीती वाढली आहे.

पूर्वी रोज दहा ते पंधरा हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता मात्र ही संख्या वाढविण्यात आली आहे. आज तब्बल पंचवीस हजारावर चाचण्या करण्यात आल्या. रोज अधिकाधिक चाचण्या करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात दिला होता. त्यानुसार या आठवड्यात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही जादा दिसत आहे.

क्लिक करा आणि वाचा- करावे तसे भरावे; नारायण राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

एकीकडे करोनाचा कहर कायम असला तरी व्यापारी मात्र अस्वस्थ झाले आहेत. दोन महिन्यापेक्षा अधिक काळ दुकाने बंद राहिल्याने आर्थिक गणित बिघडत चालले आहे. यामुळे सोमवारपासून दुकाने उघडणारच अशी भूमिका घेतली आहे. राज्यातील सात जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. यामुळे या जिल्ह्यात निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची एक बैठक झाली. त्यामध्ये यावर चर्चा झाली. व्यापाऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सरकार करणार मदत

कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक लसींचे डोस मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देवून करोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू; एकूण २० रुग्णांवर सुरू आहेत उपचार

करोना प्रादुर्भाव नियंत्रण आढावा बैठक आज मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या, उपचार पद्धती, उपलब्ध औषधसाठा, प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी बाबींचा आढावा घेऊन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात ‘करोना मुक्त गाव’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येवू शकेल. कोरोनाची तिसरी लाट व डेल्टा प्लस व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणेने आटोकाट प्रयत्न करावेत.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परब, नार्वेकर, वायकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करा: भाजपची मागणी

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून करोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला दररोज ५० हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.Source link