corona latest update in mumbai: मुंबईत आज ५६२ नवे करोना रुग्ण; पाहा, मुंबई आणि ठाण्यातील ताजी स्थिती! – mumbai registered 562 new covid cases with 629 patients recovered and 12 deaths

0
53


मुंबई: मुंबईत कालच्या तुलनेच नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ५६२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६०८ इतकी होती. तर, आज दिवसभरात ६२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर आतापर्यंत एकूण १५ हजार ४२६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (mumbai registered 608 new covid cases with 714 patients recovered and 18 deaths )

मुंबईचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७२१ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३१ हजार ७६९ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या १० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ७९ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात आज ८,०८५ नवे करोना रुग्ण; ८,६२३ झाले बरे, तर मृ्त्यू २३१

मुंबईतील करोनाची आजची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ५६२
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ६२९
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९५४२५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८३७१
रुग्ण दुप्पटीचा दर- ७२१ दिवस
कोविड वाढीचा दर ( २२ जून ते २८ जून)- ०.०९ %

क्लिक करा आणि वाचा- महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे दिसलं; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना टोला

ठाण्यात आज आढळले ६२ नवे रुग्ण

दरम्यान, ठाण्यात आज ६२ नव्या करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ठाण्यात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच ठाण्यात आजपर्यंत एकूण १ लाख ३३ हजार २१९ इतक्या लोकांना करोनाची लागण झाली, तर त्यांपैकी १ लाख ३० हजार २०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ठाण्यात १ हजार ११ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ठाण्यात एकूण २ हजार ७ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या गणेशमूर्तींनाच परवानगी

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.७३ टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर ठाण्यात रुग्ण दुपटीचा वेग हा १ हजार ०७५ दिवसांवर आला आहे.Source link