Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाCorona Update India 48 698 New Corona Cases 1183 Death On 26...

Corona Update India 48 698 New Corona Cases 1183 Death On 26 June 2021


नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी येताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यादा रुग्णसंख्या ही 50 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 48,698 रुग्णांची भर पडली आहे तर 1183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 64,818 जण कोरोनामुक्त झाली आहेत. काल एकाच दिवसात 17,303 सक्रिय रुग्णाची घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्या आधी 21 जून रोजी देशात 42,640 कोरोना रुग्णांची भर पडली होती. 

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.31 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के इतका आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या ही दोन टक्के इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतील भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

  • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी एक लाख 83  हजार 143 
  • कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी  91 लाख 85 हजार 
  • एकूण सक्रिय रुग्ण :  पाच लाख  95 हजार 656
  • एकूण मृत्यू :  तीन लाख  94 हजार 493

राज्यातील स्थिती 
राज्यात शुक्रवारी 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 10,138 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. काल 156  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 3 कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सातपर्यंत सुमारे 4 लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली

महत्वाच्या बातम्या : 

 Source link

Corona Update India 48 698 New Corona Cases 1183 Death On 26 June 2021
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News