Friday, September 17, 2021
Homeक्रीडाCoronavirus Cases India Updates 10 June 94,052 Corona Cases COVID-19 Death 6148...

Coronavirus Cases India Updates 10 June 94,052 Corona Cases COVID-19 Death 6148 Cases Last 24 Hours


Coronavirus India Cases : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 6148 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाख 51 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात 63,463 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

आज देशात सलग 28व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 33 लाख 79 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे. 

देशातील आजची कोरोनास्थिती : 

एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 91 लाख 83 हजार 121
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 76 लाख 55 हजार 493
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 11 लाख 67 हजार 952
एकूण मृतांची संख्या : 3 लाख 59 हजार 676

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 94 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5 टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधित मृत्यू भारतात झाले आहेत. 

राज्यात काल 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.  

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. काल 261 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात 10 पैक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 788 रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासांत 788 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत काल 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 80 हजार 520 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के आहे. सध्या मुंबईत 15 हजार 947 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 553 दिवसांवर गेला आहे. Source link

Coronavirus Cases India Updates 10 June 94,052 Corona Cases COVID-19 Death 6148 Cases Last 24 Hours
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News