Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रकरोना: राज्यात आज १०,०६६ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू १६३

करोना: राज्यात आज १०,०६६ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू १६३

मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून गेल्या २४ तासात एकूण १० हजार ४७० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याच दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण ११ हजार ०३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १६३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 10066 new cases in a day with 11032 patients recovered and 163 deaths today)

आजच्या १६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८५९ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ७११ इतका आहे. तर, पुण्यात एकूण १७ हजार ३७८ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार ०५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार १४२ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८३१ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७९६ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार ८४९ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ९०५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ०२९ इतकी आहे. जळगावमध्ये १ हजार ०२३, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ५७१ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ६५५ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १०८ इतकी आहे.

Source link

करोना: राज्यात आज १०,०६६ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू १६३
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News