Monday, June 21, 2021
Homeमहाराष्ट्रकरोना: आज राज्यात १०,८९१ नव्या रुग्णांचे निदान; २९५ मृत्यू

करोना: आज राज्यात १०,८९१ नव्या रुग्णांचे निदान; २९५ मृत्यू

मुंबई: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यात आज दिवसभरात १० हजार ८९१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १६ हजार ५७७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात २९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या २९५ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २० हजार ७४७ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ६४२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५५१ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार २०३ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३६९ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये ५ हजार ९३७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार २१५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ५३७ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ०४१, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ७१५ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार ५१०, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या पालघर जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३१८ इतकी आहे.

११,५३,१४७ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६९ लाख ०७ हजार १८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ५२ हजार ८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ५३ हजार १४७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ६ हजार २२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW