Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रcoronavirus updates: coronavirus in maharashtra updates करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण;...

coronavirus updates: coronavirus in maharashtra updates करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण; पाहा, आजची ताजी स्थिती! – coronavirus see latest updates maharashtra registered 9489 new cases in a day with 8395 patients recovered and 153 deaths today


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ४८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८ हजार ३९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण १५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ४८९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण ८ हजार ३९५ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १५३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या १५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- तिन्ही कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादीने स्पष्ट केली अधिकृत भूमिका

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १७ हजार १०६ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १६ हजार ६३० इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ८२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ०८७ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ५२८, साताऱ्यात ही संख्या ८ हजार २५५, रत्नागिरीत ५ हजार ५३७, रायगडमध्ये ४ हजार ९४५, सिंधुदुर्गात ४ हजार २७४, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ००९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४५५ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत-आशीष शेलार यांच्या गुप्त भेटीची चर्चा; शेलार यांचा मात्र इन्कार

यवतमाळमध्ये फक्त ५० सक्रिय रुग्ण

या बरोबरच अहमदनगरमध्ये २ हजार ८६४ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ०६९, नांदेडमध्ये ही संख्या ५०४ इतकी आहे. जळगावमध्ये ८३८, तसेच अमरावतीत ही संख्या ३३८ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५० इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ब्लॅक फंगसमुळे सीपीयूतील जवानाची पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या

६,३२,९४९ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २३ लाख २० हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ८८ हजार ८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३२ हजार ९४९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

coronavirus updates: coronavirus in maharashtra updates करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण; पाहा, आजची ताजी स्थिती! - coronavirus see latest updates maharashtra registered 9489 new cases in a day with 8395 patients recovered and 153 deaths today
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News