नागपूर सावरतंय! सलग तिसऱ्या दिवशीही शून्य करोनामृत्यूची नोंद

0
82

नागपूरः करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची मोठी संख्या अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्याला आता दिलासा मिळतोय. गेल्या दोन दिवसांपासून आटोक्यात आलेला करोना मृत्यूचा दर सलग तिसऱ्या दिवशीही रविवारी नियंत्रणात राहिला आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाची उसळी घेणाऱ्या शहरात तब्बल १३३ दिवसांनतर सलग तीनही दिवस एकही मृत्यू नोंदविले न जाण्याची ही आजवरची पहिली वेळ ठरली आहे.

एप्रिल, मे महिन्यात राज्यात करोनाचा आलेख पुन्हा वाढला होता. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत चालला होता. नागपूर शहरात करोना रुग्णांबरोबरच करोनामुळं दगावलेल्या रुग्णांचे प्रमाणही अधिक होते. मात्र, प्रशासनाची उपाययोजना व टाळेबंदीमुळं करोना संसर्ग उतरणीला येत आहे. त्याचबरोबर दिलासादियाक बाब म्हणजे करोना मृतांच्या संख्याही आटोक्यात येत आहे. त्यामुळं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र आहे.

वाचाः धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर हॉटस्पॉट ठरला होता. दैनंदिन रुग्णसंख्याही ३ ते ४ हजारांच्या घरात नोंदवली गेली होती. मात्र, आता करोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला यश आलं आहे. करोनाचा मृत्यू दर आटोक्यात येत असताना संक्रमण साखळीचा वेगही मंदावला आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या शक्यतेतून आज शहरातून तपासलेल्या ७२२३ नमुन्यांपैकी ७१७० जणांची चाचणी घेण्यात आली होती. या नमुन्यांमध्ये कोणत्याही विषाणूचा अंश न सापडल्याने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे निदान करण्यात आले आहे.नव्याने करोनाची लागण झालेल्या २६ जणांसोबतच रविवारी ९६ बाधित ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांमधून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर अर्धा टक्क्याच्या खाली ०. ३५ इतका नोंदविला गेला. विषाणूने शहरात शिरकाव केल्यापासून आजवर ३ लाख ३४ हजार ७८४ जणांना संक्रमण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यातील ३ लाख २८ हजार ६०८ बाधितांनी विषाणूवर मात केली.

Source link