Covid 19 SBI Report Says  India S Third Covid 19 Wave From August Peak In September

0
7


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्रता ओसरत असताना देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असून ती सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. ‘कोविड-19; द रेस टू फिनिशिंग लाईन’ या नावाने स्टेट बँकेच्या संशोधकांनी एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सध्याची आकडेवारी पाहता, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या 10 हजारांच्या घरात असेल. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत जाणार असून सप्टेंबरमध्ये ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे असं या अहवालात सांगितलं आहे. मे महिन्याच्या 7 तारखेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तीव्रता गाठली होती असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला. त्या लाटेच्या तुलनेत 1.7 पट तीव्र अशी कोरोनाची तिसरी लाट असेल असं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन सांगता येतं असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

सरकारी समितीचा इशारा
कोविड प्रतिबंधात्मक नियामांचे पालन न केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते, असा इशारा कोरोना साथीच्या रोगाशी संबंधित केंद्र सरकारच्या पॅनेलमध्ये सामील वैज्ञानिक, प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिला आहे. या पॅनेलवर कोविड 19 केसेसच्या मॉडलिंग करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

तिसऱ्या लाटेत दररोज रुग्णसंख्या तुलनेने कमी असेल मात्र जर नवीन कोरोना स्ट्रेन आला तर तिसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग झपाट्याने पसरु शकतो असं प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या : Source link