मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल; मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सक्षणा सलगरवर गुन्हा कधी?

पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीकेबद्दल सक्षण् सलगरवर गुन्हा कधी दाखल होईल?

0
196

मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

BMC महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा कथित अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना “अरे तुरे”ची भाषा वापरली होती. याप्रकरणी आता कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी टीकेबद्दल सक्षण सलगरवर गुन्हा दाखल होईल?, असे प्रश्न नेटीझन्स सोशल मीडिय््वर करताहेत. २०१९ निवडणूकीवेळी सक्षनाने मोदी, फडणवीस यांच्यावर टीका करतानी “अरे तुरे”चीच भाषा वापरली होती. त्यावेळी शरद पवार स्टेजवर हजर होते.

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेच्या पथकानं बुधवारी हातोडा चालवला. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनानं त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नितीन वसंत माने असं तक्रार देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here