Sunday, July 25, 2021
HomeमनोरंजनCurd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी...

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी ‘हा’ पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! – yogurt or curd can helpful in reducing stress and depression

दही तसा एक साधा पदार्थ जो प्रत्येकाच्याच घरी असतो पण तुम्हाला माहित आहे का दही म्हणजे आपल्या आरोग्याला लाभलेले वरदान आहे आणि ही गोष्ट फार कमी लोकांना ठावूक आहे. दह्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. काही महिन्यांपूर्वी एका संशोधक गटाने दुधाबाबतीत एक संशोधन केले आणि त्यात त्यांनी दुधाच्या फायद्याची पूर्ण यादीच सिद्ध केली.

आता दही बाबतीत अशाच प्रकारच्या एका संशोधनाची चर्चा सुरु आहे ज्यात संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की दह्याच्या सेवनाने लोक आपला तणाव दूर करू शकतात. हे संशोधन साइंटिफिक रिपोर्ट्स जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे, यात संशोधकांच्या टीमने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की दही कशाप्रकारे आपणा सर्व ताण तणाव दूर करू शकते व स्ट्रेस आल्यावर कोणत्या पद्धतीने दह्याचं सेवन करावं?

दह्यात आढळतात बॅक्टीरिया फ्रेंडली जीवाणू

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

संशोधकांना हे आढळून आले की दह्यामध्ये लेक्टोबेसिलस (Lactobacillus) असते जो एक प्रकारे बॅक्टीरिया फ्रेंडली जीवाणू आहे. हे शरीराध्ये माइक्रोबायोमच्या कॅरेक्टरला बदलण्यात महत्त्वाची भूमिका आणि याबजावतात. त्यामुळेच डिप्रेशन अर्थात तणाव नष्ट होतो. दही मेंदू मध्ये होणाऱ्या हार्मोन्स स्त्रावामध्ये देखील मुख्य भूमिका बजावते. या संशोधनामध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की माइक्रोबायोमच्या (microbiome) माध्यमातून तणाव वाढवणारे हार्मोन्स हे गूड फील हार्मोन्स मध्ये रुपांतरीत होतात.

(वाचा :- FSSAI चा दावा : ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास शिजवलेलं अन्नही आरोग्यासाठी ठरु शकतं धोकादायक!)

क्षणात मूड होतो ठीक

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

दही बाबत सेंटर फॉर ब्रेनचे मुख्य संशोधक अल्बान गॉल्टियर, पीएचडी यांच्या मते दही आरोग्य आणि मूड दोन्ही निरोगी राखण्याचे काम करते. संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की माइक्रोबायोम मानसिक स्वास्थ उत्तम राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे संशोधन 2014 साली प्रकाशित झाले होते ज्यात सांगण्यात आले होते की दही सारखे प्रोबायोटिक्स शरीराला अनुकूल असणाऱ्या बॅक्टीरियाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि लोकांना तणावमुक्त ठेवतात.

(वाचा :- सामान्य सर्दी-ताप असणारे लोक वॅक्सिन घेऊ शकतात का व आजारपणातील डोस निरुपयोगी होतो का?)

सकाळी करा दह्याचे सेवन

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

संशोधकांच्या मते दह्याचे सेवन केल्याने केवळ बॅक्टीरिया नियंत्रित करण्यात मदत मिळत नाही तर तणाव कमी करून मेंदू निरोगी राखण्याचे देखील काम करते. म्हणून खास करून तुम्ही सकाळी सकाळी दह्याचे सेवन केले पाहिजे. याचा शरीरावर अजून चांगला परिणाम होतो असे जाणकार सुद्धा सांगतात. या संशोधनामधून हे देखील स्पष्ट झाले आहे की दह्यात असणारे माइक्रोबायोम मानसिक स्वास्थ्याच्या चांगल्या आणि वाईट वागणुकीशी निगडीत असतात.

(वाचा :- गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे वाढलं गिरीशचं वजन, ‘या’ टिप्स फॉलो करून 1 महिन्यात घटवलं 8 किलो!)

उंदरांवर केला गेला शोध

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

संशोधकांनी उंदरांचे दोन सेट बनवून त्याचा अभ्यास केला. उंदरांच्या एका सेटला दही खाऊ घातले गेले तर दुसऱ्या सेट मधील उंदरांना दही दिले गेले नाही. नंतर संशोधकांनी त्यांच्या शरीरातील बॅक्टीरिया स्तराची तुलना केली. त्या शोधात हे दिसून आले की ज्या उंदरांना दही दिले गेले त्या उंदरांच्या आहारामध्ये लेक्टोबेसिलसची मात्रा वाढली होती आणि त्यांच्या स्थितीत सुधारणा दिसून आली. लेक्टोबेसिलस ब्लड मधील क्यूनुरेनाइनचा (असा बॅक्टीरिया जो तणाव वाढवतो) स्तर संतुलित करण्यात प्रभावी आहे. जेव्हा शरीरात लेक्टोबेसिलसची लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा तणाव अधिक वाढत जातो.

(वाचा :- इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक सल्ल्यांचे करा अनुसरण, या पद्धतीने करा पाणी व आहाराचे सेवन!)

तणाव दूर करण्यात दही आहे चांगला पर्याय

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

दही बाबत केल्या गेलेल्या या संशोधनामधील लीड प्रोफेसर अलबान गॉलटियर यांचे म्हणणे आहे की सध्या तरी डिप्रेशनवर ठोस असा उपाय उपलब्ध नाही. तसेच या आजाराला तोंड देणारे लोक अनेक इतर साइड इफेक्ट्सला देखील बळी पाडतात. म्हणून या आजारावर एखादा साधा सोपा घरगुती उपाय गरजेचा होता, जो आपल्याला दह्याच्या रुपात मिळाला आहे. तुम्ही आपल्या नियमित आहारामध्ये एक वाटी दहीचा समावेश करा आणि बघा तुम्हाला स्वत:लाच फरक दिसू लागेल मात्र रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये.

(वाचा :- International Yoga Day 2021 : पचनशक्ती व डोळ्यांची नजर मजबूत होण्यासाठी नियमित करा ‘ही’ 5 साधीसोपी योगासने!)

दह्यातील पोषक तत्व

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression

दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी -2, मेग्निशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व आढळतात. साखरेसोबत दही खाल्ल्याने देखील जास्त लाभ मिळतात. दह्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि तंत्रिका तंत्र देखील स्वस्थ राखतात.

(वाचा :- लठ्ठ बोलून हिणवायचे लोक, नाश्त्यात ‘हा’ सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन!)

सूचना – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. डिप्रेशनवर हा उपाय रामबाण असल्याचा कोणत्याही प्रकारे दावा यातून केला जात नाही आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जाणकारांशी आणि उपचारासाठी डॉक्टरांशी एकदा संपर्क करावा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यावा.Source link

Curd Rice recipe: मूड खराब असल्यास खा १ वाटी 'हा' पदार्थ, वैज्ञानिकांनी स्ट्रेस घालवण्यासाठी यास दिलाय अव्वल दर्जा! - yogurt or curd can helpful in reducing stress and depression
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News