Sunday, July 25, 2021
HomeपुणेDelta plus variant: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास, विदर्भातील 100 नमुने पुण्यातल्या...

Delta plus variant: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास, विदर्भातील 100 नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत रवाना | Coronavirus-latest-news


कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास, विदर्भातील 100 नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत रवाना

Delta plus variant: या व्हेरिएंटमुळे राज्यातल्या विविध भागात कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा अभ्यास करण्यात येणार आहे.

नागपूर, 30 जून: देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं (Second Wave) थैमान घातलं होतं. एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं (Delta plus variant)डोकं वर काढलं आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा (Third Wave) धोका असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. डेल्टा प्लस (Coronavirus New Strain)या व्हेरिएंटचे 7 जिल्ह्यांमध्ये 21 रुग्ण आढळून आले. त्यात एकाचा मृत्यू देखील झाला.

या व्हेरिएंटमुळे राज्यातल्या विविध भागात कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली. तसंच भारतीय वैद्यकीय चिकित्सा अनुसंधान परिषदेनं (ICMR) देखील या वृत्ताला दुजोरा दिला. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा अभ्यास करण्यात येणार आहे. नागपुरातील (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी गेल्या 7 दिवसांत 100 नमुने गोळा करण्यात आले असून ते आता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत.

हेही वाचा-  वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे चार दिवसांत गजाआड, ‘या’ क्लूच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुण्यातल्या NIVमधील व्हायरसचे अभ्यासक या नमुन्यांमधील व्हायरसच्या जनुकीय साखळीचा अभ्यास करतील या अभ्यासाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी आणखीन 5 ते 7 दिवस लागणार आहे. त्यामुळे या जनुकीय साखळीच्या संधोधनातून काय निष्कर्ष निघेल याकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलं आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी व्हायरॉजिच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नमुने पाठवण्यात आलेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात कोरोनानं दोन्ही लाटेत धुमाकूळ घातला. विदर्भातल्या नमुन्यांमध्ये व्हायरसचे पाच नवे स्ट्रेन आढळून आले होते.

दरम्यान नव्यानं मेडिकलमधून जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आलेल्या 100 नमुन्यांच्या अहवालातून काय समोर येते, याकडे विदर्भाकराचं लक्ष लागून राहिलं आहे.


Published by:
Pooja Vichare


First published:
June 30, 2021, 6:37 AM IST





Source link

Delta plus variant: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शास्त्रीय अभ्यास, विदर्भातील 100 नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत रवाना | Coronavirus-latest-news
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News