[ad_1]
नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना विरोधात 77.4 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच डेल्टा व्हेरिएंटविरोधात ही लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील संक्रमणाविरोधात ही लस 93.4 टक्के प्रभावी असल्याच स्पष्ट झालं आहे. असिम्टोमॅटिक प्रकारात ही लस 63 टक्के प्रभावी आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या फेजच्या चाचणीमध्ये 18 ते 98 वर्षे वयोगटातील 25,800 स्वयंसेवकांना सामिल करुन घेतलं होतं. देशभरातील 25 ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली आहे.
Bharat Biotech concludes final analysis for Covaxin efficacy as part of phase 3 clinical trials, after evaluation of 130 confirmed cases. Covaxin’s efficacy demonstrated at 77.8% against symptomatic COVID19 patients pic.twitter.com/srCHFoNVZT
— ANI (@ANI) July 3, 2021
डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली असून सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस देण्यास सुरु आहे.
हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून या आधीच स्पष्ट झालं होतं.
अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातूनही कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
[ad_2]
Source link