Home देश-विदेश Caste Based Survey Report in Bihar | बिहारमध्ये बिहारची जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर, कोणत्या जातीचा किती टक्का? जाणून घ्या सविस्तर

Caste Based Survey Report in Bihar | बिहारमध्ये बिहारची जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर, कोणत्या जातीचा किती टक्का? जाणून घ्या सविस्तर

0
Caste Based Survey Report in Bihar |  बिहारमध्ये बिहारची जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर, कोणत्या जातीचा किती टक्का? जाणून घ्या सविस्तर

शासननामा न्यूज ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जबरदस्त मास्टरस्ट्रोक मारला आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जात आधारित सर्वेक्षण अहवाल जाहीर केला आहे. बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्वाधिक संख्या अत्यंत मागासवर्गीयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागास आणि अत्यंत मागासवर्गीयांची एकूण लोकसंख्या ६३ टक्के आहे. तर यादव समाजाची लोकसंख्या १४ टक्के आहे. राज्यात केवळ चार टक्के ब्राह्मण आहेत. अनुसूचित जातीची लोकसंख्या 20 टक्के आहे.

या आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक आकडेवारी अति मागासवर्ग (ईबीसी)ची आहे. अति मागास वर्गाची संख्या 36.01 टक्के आहे. त्यानंतर मागास वर्गाचा (ओबीसी) नंबर लागतो. ओबीसींची राज्यातील संख्या 27.13 टक्के आहे. तिसऱ्या नंबरवर सामान्य वर्ग आहे. या वर्गाची लोकसंख्या 15.52 टक्के एवढी आहे.

कोणता समाज जास्त आहे ?

बिहारमध्ये यादव समाजाची संख्या सर्वाधिक आहे. बिहारमध्ये यादव समाज एकूण 14 टक्के आहे. यादव समाजात ग्वाला, अहीर, घासी, सदगोप आणि मैहर आदी जातींचा समावेश करण्यात आला आहे. यादवानंतर बिहारमध्ये कुशवाहा (कोईरी) समाजाचा नंबर लागतो. कुशवाह समाजाची लोकसंख्या 4.21 टक्के आहे. तर ब्राह्मणांची लोकसंख्या 3.86 टक्के आहे. राजपूत समाजाची लोकसंख्या 3.45 टक्के तर मुसहर जातीची लोकसंख्या 3.08 टक्के आहे.

बिहारच्या राजकारणात कुर्मी जातीचं प्रचंड वर्चस्व आहे. या जातीची लोकसंख्या केवळ 2.87 टक्के आहे. तर बढई समाजाची लोकसंख्या 1.45 टक्के आहे. याशिवाय पासी समाजाची लोकसंख्या 0.98 टक्के असूनमल्लाह समाजाची लोकसंख्या 2.6 टक्के आहे. या जनगणनेनुसार बिहारमध्ये बनिया समाजाचे 2.3 टक्के लोक राहतात. कानू समाजाचे 2.6, नेनिया समाजाचे 1.9, कुंभार जातीचे 1.4 टक्के लोक राहत आहेत.

मुस्लिम (जुलाहा/अन्सारी)- 3.54%

प्रजापती (कुंभार)- 1.40%

कानू- 2.2%

तेली- 2.81%

शेख- 3.82%

दुसाध, धारी, धरही- 5.3%

धानुक- 2.1%

न्हावी- 1.59%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here