[ad_1]
Corona Cases Today : देशात 88 दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 60 हजारांहून कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 53,256 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1422 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 47,262 कोरोना रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. काल दिवसभरात 78,190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशात सलग 39व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांच्या संख्येहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 20 जूनपर्यंत देशभरात 28 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 30 लाख 39 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 39 कोटी 24 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 14 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 99 लाख 35 हजार 221
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 88 लाख 44 हजार 199
एकूण सक्रिय रूग्ण : 7 लाख 2 हजार 887
एकूण मृत्यू : 3 लाख 88 हजार 135
देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.29 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
रविवारी राज्यात 9,101 रुग्ण बरे होऊन घरी, 9,361 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात काल (रविवारी) 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9,101 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 इतकी झाली आहे. आज 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 10,373 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
सरसकट अनलॉकमुळे नंबर वाढत असल्याचं दिसून येत आहे. काल नवी मुंबईत शून्य होते नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आज 178 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल ठाणे शहरात 61, कल्याण डोंबिवलीत 36, पालघरमध्ये 94 रुग्णांची नोंद झाली होती तर आज ठाणे शहरात 129, कल्याण डोंबिवलीत 113, पालघरमध्ये 353 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,72,781 (15.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96,297 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,683 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]
Source link