Coronavirus India Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरम्यान, देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची स्थिती काय?
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 96 लाख 33 हजार 105
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 83 लाख 88 हजार 100
एकूण सक्रिय रुग्ण : 8 लाख 65 हजार 432
एकूण मृत्यू : 3 लाख 79 हजार 573
आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 19 लाख 72 हजार 14
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 28,00,458 वॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर एकूण वॅक्सिनेशनचा आकडा 26,19,72,014 वर पोहोचला आहे. तसेच भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) यांनी सांगितलं आहे की, भारतात काल कोरोना चाचणीसाठी 9,30,987 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 38,33,06,971 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत.