Home देश-विदेश Hajj 2021 Cancelled Muslim Pilgrimage Called Off Second Straight Year Due Covid Pandemic

Hajj 2021 Cancelled Muslim Pilgrimage Called Off Second Straight Year Due Covid Pandemic

0
Hajj 2021 Cancelled Muslim Pilgrimage Called Off Second Straight Year Due Covid Pandemic

[ad_1]

भारतात मंगळवारी हज समिती ऑफ इंडियाने हज यात्रेसाठीचे यंदाचे (2021) सर्व अर्ज रद्द केले आहेत. सौदी अरेबियाने केवळ नागरिकांना आणि रहिवाशांना मर्यादित संख्येने हज 2021 ला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

“सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर पसरलेल्या स्थितीमुळे सौदी अरेबियाने देशातील नागरिकांना आणि रहिवाशांना मर्यादित संख्येने हज 2021 ला जाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय हज यात्रा रद्द करण्यात आल्याचं सागण्यात आलं आहे. त्यामुळे हज 2021 चे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय हज समिती ऑफ इंडियाने घेतला आहे.

शनिवारी, सौदी अरेबियाने जाहीर केले की कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी हज यात्रेसाठी 60,000 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. गेल्या वर्षी या या संसर्गामुळे या यात्रेवर सावट आलं होतं. आता यंदाच्या वर्षी मर्यादीत लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या हजमध्ये सौदी अरेबियात आधीच राहणाऱ्या सुमारे 1000 लोकांना हजमध्ये भाग घेण्यासाठी निवडण्यात आले होते. यात 160 वेगवेगळ्या देशांतील रहिवासी होते, ज्यांचे सामान्यत: हज येथे प्रतिनिधित्व असते. एक तृतीयांश सौदी सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी होते. दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष मुस्लिम हज यात्रा करतात.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here