Home देश-विदेश पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत्याने वाढ असल्याने हाहाकार…

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत्याने वाढ असल्याने हाहाकार…

0
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत्याने वाढ असल्याने हाहाकार…

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत्याने वाढ असल्याने हाहाकार माजला आहे. कोरोना आणि त्यात लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पन्न कमी आणि महागाई जास्त अशा स्थितीत सामान्य नागरिक अडकले आहेत. अशातच आज इंधनाच्या वाढत्या दरांबाबत संसदेच्या स्थायी समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

दर आणि मार्केटिंगच्या मुद्द्यावर माहिती घेणार
ही बैठक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या स्थायी समितीची आहे. या समितीने पेट्रोलिय मंत्रालय, IOC, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं आहे. बैठकीत सध्याचे दर आणि मार्केटिंगच्या मुद्द्यावर मागितली जाईल. नैसर्गिक वायूचे सध्याचे दर आणि मार्केटिंगच्या मुद्द्यावरही माहिती घेतली जाईल. या बैठकीत GAIL च्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

अनेक शहरांमध्ये पेट्रोल शंभरीच्या पार
पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता संपूर्ण देशातच पेट्रोलचे दर शंभरी पार करेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. याआधी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या राही शहर आणि जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या प्रति लिटर दरात 25 पैशांनी वाढ झाल्याने 96.66 रुपयांवर पोहोचलं आहे, तर 13 पैशांच्या वाढीसह डिझेल प्रति लिटर 87.41 रुपये झालं आहे. मुंबईत 29 मे रोजी पहिल्यांदा पेट्रोलने 100 रुपयांचा दर पार केला होता. तर काल (16 जून) पेट्रोलने 102.82 रुपये प्रति लिटर असा नवा दर नोंदवला. शहरात डिझेलच्या किंमतीतही 14 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. डिझेलसाठी 94.84 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. त्यामुळे डिझेलही लवकरच शंभरी पार करेल, असं म्हटलं जात आहे.

25 दिवसात इंधनाच्या दरात 6.62 रुपयांनी वाढ
राजधानी दिल्लीत मागील 25 दिवसात पेट्रोलच्या दरात  प्रति लिटर 6.26 रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचे दरही प्रति लिटर 6.68 रुपयांनी वाढले आहेत.

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ आहे. आज (17 जून) तेल कंपन्यांनी दरात कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु अनेक शहरांत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार गेले आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल (107.79 रुपये) राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. जाणून घेऊया आजचे दर (स्रोत. IOC)

शहराचं नाव                      पेट्रोल रुपये/लिटर   डिझेल रुपये/लिटर

श्रीगंगानगर (राजस्थान)          107.79                100.51
अनूपपुर (मध्य प्रदेश)            107.43                  98.43
रीवा (मध्य प्रदेश)                  107.05                  98.09
परभणी (महाराष्ट्र)                 103.92                  94.46
इंदौर (मध्य प्रदेश)                104.92                  96.14
जयपुर (राजस्थान)                103.29                  96.38
दिल्ली                                  96.66                  87.41
मुंबई (महाराष्ट्र)                    102.82                  94.84
चेन्नई (तामिळनाडू)                 97.91                  92.04
कोलकाता (प. बंगाल)             96.58                  90.25
भोपाल (मध्य प्रदेश               104.85                  96.05
रांची (झारखंड)                        92.7                  92.27
पाटणा (बिहार)                      98.73                  92.72
लखनौ (उत्तर प्रदेश)               93.88                  87.81

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here