भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 94,052 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 6148 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाख 51 हजार 367 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात 63,463 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आज देशात सलग 28व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 33 लाख 79 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे.

















