Home देश-विदेश Johnson & Johnson Covid Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचा सिंगल डोस भारताला मिळण्याची शक्यता, ‘हा’ आहे केंद्र सरकारचा प्लॅन

Johnson & Johnson Covid Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचा सिंगल डोस भारताला मिळण्याची शक्यता, ‘हा’ आहे केंद्र सरकारचा प्लॅन

0
Johnson & Johnson Covid Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचा सिंगल डोस भारताला मिळण्याची शक्यता, ‘हा’ आहे केंद्र सरकारचा प्लॅन

नवी दिल्ली : भारत सरकार अमेरिकेची फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) बरोबर कोरोनाच्या सिंगल डोस लसीसाठी चर्चा करत आहे. ही आरोग्य मंत्रालयाच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत  नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (V.K. Paul) यांनी दिली आहे.

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन बाहेर होते.  परवानगी मिळाल्यानंतर सरकारच्या योजनेनुसार या लसीचे उत्पादन देशात हैदराबादच्या बायो ई येथे करण्यात येईल.

दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनचा कोरोना विरोधातील  सिंगल डोस डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. लसीचा सिंगल डोस गंभीर किंवा अत्यंत गंभीर आजाराच्या विरुद्ध 85% प्रभावी आहे.

सध्या देशात चार कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आप्तकालीन वापरास परवानगी मिळाली आहे. कोव्हिशिल्ड, को-वॅक्सीन, स्पूटनिक व्ही आणि मॉडर्ना या चार लसीला परवानगी देण्यात आली आहे.

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, झायडस कॅडिलाची झायकोवी-डी या लसीच्या परवानगीचा अर्ज सध्या डीसीजीआयकडे आहे. सध्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीद्वारे लसीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. या लसीला परवानगी मिळाली तर भारतात लसीकरणाची मोहिमेला हातभार लागेल. या लसीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांना देखील घेता येणार आहे. कंपनीने आतापर्यंत 28 हजार ट्रायल केल्यानंतर आप्तकालीन वापरासाठी डिसीजीआयकडे अर्ज केला आहे.

भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  34 कोटींचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत  एकूण 34 कोटी 76 हजार 232  मात्रा देण्यात आल्या आहेत. भारतात सध्या 34 कोटी 76 हजार 232 डोस दिले गेले आहेत. सध्या दररोज साधारण 40 लाख लोकांना लस दिली जाते, या गतीने भारतातील 75 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असा अंदाज आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here