नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे (Athlete Milkha Singh’s wife Nirmal Kaur dies of COVID-19) निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. आॅक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच आठवड्यात पत्नीचे निधन झाले होते. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निधनानंतर दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “एक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले”.