Home क्रीडा Milkha Singh Death: मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर

Milkha Singh Death: मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर

0
Milkha Singh Death: मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर

स्वतंत्र भारताचा सर्वात मोठा खेळाडू असलेल्या मिल्खा सिंग याच्यावर शनिवारी संध्याकाळी संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका महिन्यासाठी कोरोना संक्रमणाशी झुंज देऊन रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. मिल्खा सिंह यांच्या निधनावर पंजाब सरकारने एक दिवस राज्य शोक जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निवासस्थानी शेवटच्या दर्शनापर्यंत पोहोचले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

देशाचे अभिमान असलेले महान धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार असल्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंग यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. ‘फ्लाइंग शीख’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना गुरुवारी कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांची तब्बेत अचानक खालावली आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तत्पूर्वी, ट्विटद्वारे अमरिंदरसिंग यांनी मिल्खा सिंग यांच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मिल्खासिंग जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले आहे. हा एका युगाचा शेवट आहे. संपूर्ण देश आणि पंजाबचे हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुबियांबद्दल आणि त्यांच्या लाखो चाहत्यांविषयी माझ्या सहवेदना आहेत. येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे नाव जगभर लक्षात राहील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले की, “आज श्री मिल्खासिंग जी यांचे निधन झाल्यामुळे आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. त्यांनी आपल्या खेळाने देशाच्या स्वप्नांना नवीन उड्डाण दिले. मिल्खा सिंग यांना भारतीय लोकांच्या हृदयात खास स्थान आहे, त्यांनी आपल्या प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाने कोट्यावधी लोकांच्या जीवनावर परिणाम केला. त्यांच्या निधनाने मला फार दु:ख झाले आहे. मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे याच आठवड्यात वयाच्या 85 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर पाचच दिवसात मिल्खाही जग सोडून गेले.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडूनही दुःख व्यक्त
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, भारताने एक महान खेळाडू गमावला आहे. ते म्हणाले, “मिल्खा जी आता आमच्या पाठीशी नाहीत पण त्यांनी प्रत्येक भारतीयाला देशाचे वैभव प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले आहे. फ्लाइंग शीख नेहमीच भारतीयांच्या मनात राहतील.”

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here