Home देश-विदेश Narayan Rane’s First Press Conference After Taking Oath As Union Minister | Narayan Rane

Narayan Rane’s First Press Conference After Taking Oath As Union Minister | Narayan Rane

0

[ad_1]

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

आता वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. माझा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास दोन मिनिटांत सांगणे सोपं नाही. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले. 

नारायण राणे यांची केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी लाडू, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राणे साहेब आगे बढो हम तुमारे साथ है! अशा घोषणा दिल्या. शिवाय फटाके फोडत मिठाईचे वाटप आपला आनंद व्यक्त केला आहे.

नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष

महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. किमान 11 जणांनी राजीनामा आत्तापर्यंत दिला आहे, अशी माहिती आहे.

अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here