Home देश-विदेश Old Man Wraps A Snake Around His Neck, Video Goes Viral In Belgaum!

Old Man Wraps A Snake Around His Neck, Video Goes Viral In Belgaum!

0
Old Man Wraps A Snake Around His Neck, Video Goes Viral In Belgaum!

[ad_1]

बेळगाव : साप म्हटलं तरी सर्वसामान्य माणूस दोन पावले मागे सरकतो. साप पाहिल्यावर भल्या भल्यांची त्रेधातिरपिट उडते. पण एक वृद्ध माणूस आपल्या गळ्यात साप गुंडाळून सायकल वर फिरतो यावर तुमचा विश्वास बसेल काय? होय ही सत्य घटना आहे. बेळगाव जवळील हंगरगा गावात हे अनोखे दृश्य अनेकांना पाहायाला मिळाले. हंगरगा गावातील मुख्य रस्त्यावरून एक वृद्ध अगदी आरामात गळ्याला  साप गुंडाळून  सायकल वरून फिरत असल्याचे शनिवारी दुपारी गावातील अनेकांनी  पाहिले.

हे दृश्य दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांनी मोबाईल मध्ये चित्रित केले. नंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा वृद्ध कोणत्या गावाचा आहे,त्याने गळ्यात गुंडाळलेला साप विषारी आहे की बिन विषारी याची माहिती उपलब्ध झाली नाही.पण सध्या हा व्हिडिओ सगळीकडे चांगलाच व्हायरल झालाय.

त्याच झालं असं की, हंगरगा गावातील या वृद्धाच्या घरात साप आला होता.घरात आलेला साप या वृद्धाने पकडला.नंतर त्याने तो साप चक्क आपल्या मानेभोवती गुंडाळला.घरातील इतर लोक हे  दृश्य पाहून थंडच पडले.नंतर त्या वृद्धाने सरळ सायकलवर टांग मारली.हा वृद्ध सायकलवरून जात असताना गावातील लोक डोळे विस्फारून बघत होते. नंतर या वृद्धाने गावा बाहेरील जंगलात सापाला सोडले आणि तो घरी परतला.

पाहा व्हिडीओ

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here