PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामुळे भाजपला देशात काय फायदा होईल?

0
120

मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. नव्या मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल देखील साधण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चौघांना संधी मिळाली असून आधी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतंही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

Source link