[ad_1]
<p><strong>PM Modi Cabinet, EXCLUSIVE:</strong> आज संध्याकाळी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. </p>
<p>मोदी मंत्रिमंडळात 12 अनुसूचित जाती प्रवर्गातील मंत्री असतील यातील 8 कॅबिनेट मंत्री असतील जे आठ वेगवेगळ्या राज्यातील असतील. अनुसूचित जनजातीमधील 8 मंत्री असतील त्यात तीन कॅबिनेट असतील. ओबीसी प्रवर्गातून 27 मंत्री मोदी मंत्रिमंडळात असतील यातील पाच कॅबिनेट मंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे. </p>
[ad_2]
Source link