Home देश-विदेश PM Modi Cabinet Expansion :महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा तर नवीन चौघांना मंत्रिपदं, केंद्रात राज्यातले ‘इतके’ मंत्री!

PM Modi Cabinet Expansion :महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा तर नवीन चौघांना मंत्रिपदं, केंद्रात राज्यातले ‘इतके’ मंत्री!

0

PM Modi Cabinet Expansion :  मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चौघांना संधी मिळाली असून आधी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतंही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल,प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. यापैकी रावसाहेब दानवे आणि धोत्रे यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात आठ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. किमान 11 जणांनी राजीनामा आत्तापर्यंत दिला आहे, अशी माहिती आहे.

हे असतील नवीन मंत्री 
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ वीरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य शिंदे
रामचंद्र प्रसाद सिंह
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरण रिजिजु
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेंद्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
पंकज चौधरी
अनुप्रिया सिंह पटेल
सत्यपालसिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंदलजे
भानू प्रतापसिंह वर्मा
दर्शना विक्रम जार्दोस

मीनाक्षी लेखी
अन्नपूर्णा देवी
ए नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट
बीएल वर्मा
अजय कुमार
देवूसिंह चौहान
भगवंत खुबा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ सुभाष सरकार
डॉ भागवत कराड
डॉ राजकुमार रंजन सिंह
डॉ भारती पवार
बिश्वेश्वर तुडू
शंतनू ठाकूर
डॉ मुंजापारा महेंद्रभाई
जॉन बार्ला
डॉ एल मुरुगन
डॉ निशीत प्रामाणिक

अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा  राजीनामा

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रकृती अस्वास्थाचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमेश पोखरियाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तब्येतीच्या कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी रमेश पोखरियाल यांना प्रकृती अस्वास्थामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना जवळपास 15 दिवसांसाठी आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अशातच पोखरियाल यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांची शिक्षणमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रमेश पोखरियाल निशंक यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री पद रिकामं असून सिंधिया यांची वर्णी लागू शकते.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. सध्या हर्षवर्धन हे दिल्लीतील चांदनी चौक यैथील लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्रीपद रिक्त असून या पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. तसेच या पदासाठी एखाद्या तरुण नेतृत्त्वाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती :

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
थावरचंद गहलोत
बाबुल सुप्रियो
संतोष गंगवार
सदानंद गौडा
अश्विनी कुमार चौबे
प्रताप चंद्र सारंगी
संजय धोत्रे
रावसाहेब दानवे पाटील

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here