[ad_1]
Swami Vivekananda : भारतीय ज्ञान आणि वेदांत तत्वज्ञानाचे दर्शन पाश्चिमात्यांना करुन देणारे आणि अध्यात्माच्या जगतात वेगळाच ठसा उमटवणाऱ्या स्वामी विवेकानंदांची आज पुण्यतिथी देशभरात साजरी केली जात आहे. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदांत तत्वज्ञान या सारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विषयावरील त्यांच ज्ञान विशाल होतं.
स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भूवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.
स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे आजपासून सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्यांठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी भारतीय धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर विवेकानंदानी संपूर्ण देश पालथा घातला. त्यांनी भारताच्या गरीबी, गुलामी आणि जातीय व्यववस्थेचं चिंतन केलं. वेदान्त तत्वज्ञानावर त्यांनी भारतभर भाषणे दिली. विवेकानंदानी 1 मे 1897 साली कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तसेच 9 डिसेंबर 1898 रोजी गंगेच्या किनारी बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली.
हिंदू धर्म आणि वेदांत
धर्माच्या बाबतील विवेकानंदांचे विचार प्रगतीशील होते. विवेकानंद कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नव्हते. त्यांनी भारतासमोर आणि जगासमोर वेदांत तत्वज्ञानाची मिमांसा केली ती नक्कीच धर्माचे खऱ्या अर्थाने चिंतन करते. विवेकानंद म्हणायचे की आपण वेदांताशिवाय श्वासही घेऊ शकणार नाही, मनुष्याच्या जीवनात जे काही घडतंय ते वेदांताच्या प्रभावातूनच घडतंय.
विवेकानंदांच्या मते वेदांत तत्वज्ञान हेच खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण देतंय. वेगवेगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते वेदांत तत्वज्ञानामधून शिकता येतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की हिंदू धर्माचा खरा संदेश हा मनुष्याला वेगवेगळ्या संप्रदायात विभागणी करणे नसून सर्वांना मानवतेच्या एका सूत्रात बांधणे हा आहे.
विवेकानंदांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे 4 जुलै 1902 साली वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा मृत्यू झाला. बेलूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
[ad_2]
Source link