कोरोना ते म्युकर सर्व आजारापासून बचाव करणाऱ्या ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची नरसी मोनजी स्कुल ऑफ सायन्स कडून निर्मिती, देशातील पहिला बॅटरी ऑपरेडेड मास्क, मास्कच्या पृष्ठभागावर जमा होणारे विषाणू, बॅक्टरीया क्षणात नष्ट होणार असल्याचा दावा, मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला ‘बॅटरी ऑपरेटेड मास्क’ असून या मास्कमध्ये बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाचा असेल किंवा अन्य कोणताही विषाणू , बॅक्टरीया या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात नष्ट होतो. त्यामुळे मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार असल्याचे, नसरी मुनजी स्कुल ऑफ सायन्सच्या ज्या प्राध्यापकांनी याची निर्मिती केली आहे त्यांनी हा दावा केला आहे.