Home देश-विदेश Twitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले

Twitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले

0
Twitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले

नवी दिल्ली : भारत सरकारशी संघर्ष करणे सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरला खूप महागात पडत आहे. गेल्या चार महिन्यांत या अमेरिकन कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. ‘बिझनेस टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने आयटी नियमांत बदल केले आहेत, त्यानुसार आता ट्विटरने भारतात आपले कायदेशीर संरक्षण गमावले आहे. 16 जून रोजी ट्विटरने भारतात असलेले कायदेशीर संरक्षण गमावले आणि आता कोणत्याही थर्ड पार्टी कंटेंटसाठी (कोणत्याही वापरकर्त्याने पोस्ट केलेला कंटेंट) आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ट्विटरला मोठे नुकसान

गेल्या तीन-चार महिन्यांत भारत सरकारबरोबर सतत उडणाऱ्या चकमकींमुळे ट्विटरला खूप त्रास सहन करावा लागला आहे. बुधवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये ट्विटरचा शेअर जवळपास अर्ध्या टक्क्याने घसरला.

यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी ट्विटरचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी $ 80.75 वर पोहोचले. परंतु त्यानंतर त्यामध्ये सुमारे 25.78% घट झाली आहे. ट्विटरची संपत्ती घसरून 47.64 अब्ज डॉलरवर गेली आहे.

गेल्या वर्षी 13 नोव्हेंबर रोजी जेव्हा भारत सरकारने ट्विटरला नोटीस पाठविली होती, तेव्हा त्यांनी लडाखऐवजी लेहला जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून का दर्शविले आहे, असा आक्षेप नोंदवला होता. यानंतर #BanTwitter ने सोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरवात केली.

असे असूनही फेब्रुवारीपर्यंत त्याचे समभाग चढत राहिले. यानंतर भारत सरकारने ट्विटरला शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविणार्‍या अनेक खात्यांवर बंदी घालण्याची नोटीस पाठविली. आयटी कायद्याच्या कलम 69 ए अन्वये ट्विटरने जर मानकांचे पालन केले नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे सरकारने म्हटले होते.

सातत्याने सरकारशी संघर्ष

8 फेब्रुवारी रोजी सरकारने ट्विटरला पाकिस्तानच्या सहकार्याने खालिस्तान समर्थक असलेली 1,178 खाती काढण्यास सांगितले होते. परंतु ट्विटरने या सूचनेला प्रतिसाद दिला नाही.

यावर्षी 25 फेब्रुवारीला मोदी सरकारने नवीन आयटी नियमांतर्गत सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन आचारसंहिता तयार केली. तोपर्यंत ट्विटरच्या शेअर्सवर कोणताही परिणाम झाला नाही आणि 26 फेब्रुवारी रोजी त्याचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते.

परंतु भारत सरकारशी सुरू असलेल्या संघर्षामुळे त्याचे शेअर्स परत उसळी घेऊ शकले नाहीत. 13 मे रोजी ते खाली घसरले आणि $50.11 पर्यंत खाली आले. यानंतर 5 जून रोजी भारत सरकारने नवीन आयटी नियम पाळण्याविषयी ट्विटरला अंतिम नोटीस पाठविली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here