धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे चा भाजपा ओबीसी मोर्चा राज्यव्यापी चक्काजाम अंदोलनाला पाठिंबा जाहीर…

0
59

कल्याण (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

 

दिनांक 23 जून रोजी कल्याण पूर्व येथे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या कार्यालयात 26 जून रोजी होणाऱ्या  भारतीय जनता पार्टी राज्यव्यापी ओबीसी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी  पूर्व नियोजन सभा संपन्न झाली.  यावेळी धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे च्या वतीने लेखी पत्राद्वारे जाहिर पाठिंबा दिला.

हेही वाचा : ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी’; फडणवीसांचे टीकास्त्र

यावेळी सभेचे अध्यक्षस्थान आदरणीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील  यांनी भूषविले. सभेसाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण , माजी आमदार गणपत शेठ गायकवाड, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री अनिल पंडित साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी संपर्क प्रमुख कविता लोंढे , भाजपा ओबीसी मोर्चाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र चंदे ; भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, युवा मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमित देसाई, ओबीसी मोर्चाचे कल्याण जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाचे  ठाणे जिल्हा महासचिव श्री. सुनील म्हसकर, श्री सुरेश बांगर; जिल्हापदाधिकारी गणेश भोपी, स्वाती बेळंके, श्री. राजेशकुमार शिर्के, श्री प्रकाश सांडे, योगेशजी परदेशी आदी प्रमुख  मान्यवर उपस्थित होते!

हेही वाचा : अजित पवारांचीही CBI चौकशी करावी, भाजप कार्यकारिणी ठराव

  कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील  यांनी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात झाली. यावेळी ओबीसी मोर्चाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव  अनिल पंडित यांनी सभेचे प्रास्ताविक केले. सभेसाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण  आणि माजी आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले!

हेही वाचा : लशींसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश

सभेस धनगर समाज बांधव संदेश परदेशी, किशोर हरणे, रितेश (बबलु) परदेशी, मनोज परदेशी आदि उपस्थित होते.

हेही वाचा : Nana Patole: राज्यातील काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली? नाना पटोलेंना दिल्लीचे तातडीचे बोलावणे