dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण – dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

0
24

महागडे कपडे, ड्रेसिंग स्टाइल, उच्च राहणीमान यामुळे अभिनेत्री दिया मिर्झा सतत चर्चेत असते. ग्लॅमरस आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत कसं राहता येईल हे या अभिनेत्रीला चांगलच ठाऊक आहे. एकापेक्षा एक हिंदी चित्रपट गाजवणारी ही अभिनेत्री आजच्या पिढीमधील अभिनेत्रींना देखील सौंदर्याच्या बाबतीत तगडी टक्कर देते. वेस्टर्न आउटफिटमध्ये दिया अगदी आकर्षक दिसतेच. पण पारंपरिक ड्रेस परिधान करण्याकडे तिचा अधिक कल असतो. इंडियन आउटफिट्समधील बरेच फोटो दिया तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असते.

एखादा कार्यक्रम असो वा पुरस्कार सोहळा दिया पारंपरिक पोषक परिधान करण्यास प्रथम प्राधान्य देते. अशाच एका कार्यक्रमासाठी दियाने आकर्षक लेहंगा परिधान केला होता. तिचे या लेहंग्यामधील फोटो पाहून नेटकरीही हैराण झाले. तिने या लेहंग्यामध्ये वेगवेगळ्या पोझ देत साधं फोटोशूट देखील केलं. तिच्या या हॉट आणि बोल्ड लुकवर एक नजर टाकुया.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स, @diamirza)

​आकर्षक एम्ब्रॉयडरी

dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण - dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

दिया मिर्झा पारंपरिक पोषाखाच्या भलतीच प्रेमात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या फोटोंकडे पाहून ते लक्षात येतंच. तिच्या वॉर्डरोबमध्ये देखील विविध प्रकारचे पारंपरिक आउटफिट्स आहेत. एका वेडिंग रिसेप्शनसाठी देखील दियाने हेवी एम्ब्रॉयडरीचा आयवरी लेहंगा परिधान केला होता. याचबरोबर तिने मॅचिंग स्ट्रॅपी ब्लाउज परिधान करणं पसंत केलं. हा लेहंगी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरेने डिझाइन केला होता. या लेहंग्यामध्ये दियाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं.

(अभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा)

​बोल्ड अन् हॉट लुक

dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण - dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

दिया मिर्झाच्या मोहक सौंदर्याचे तर लाखो चाहते आहेत. वयाची ३५शी ओलांडल्यानंतरही दिया अगदी तरुण आणि आकर्षक दिसते. या लेहंग्यामध्ये देखील तिचं खुलून दिसणारं सौंदर्य कौतुकास्पदच होतं. हा लेहंगा तयार करण्यासाठी रॉ सिल्क फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. तसेच लेहंग्यावर असणारी सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी विशेष लक्ष वेधून घेणारी होती. दियाच्या सौंदर्याचं मुख्य रहस्य म्हणजे तिच्यामधील साधेपणा. या आउटफिटमध्ये तिचा साधेपणा दिसून येत होता.

(मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक)

मोहक सौंदर्याचं कौतुक

dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण - dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

दियाने सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट केला की नेटकरी त्याला भरभरून प्रतिसाद देतात. तसेच तिला आजवर आपण वेगवेगळ्या लुकमध्ये पाहिलं आहे. प्रत्येक आउटफिटमध्ये ती तितकीच गोड आणि सुंदर दिसते. दियाच्या या सिंगल रंगाच्या आयवरी लेहंग्याची खासियत म्हणजे यावर सोनेरी तारांचं सुंदर असं वर्क करण्यात आलं होतं. या फ्लोअर लेन्थ लेहंग्याला ए-लाइन पॅटर्न टच देण्यात आला होता. तसेच या लेहंग्यावरील बारीक नक्षीदार भरतकाम दियाच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालत होतं.

(अजय देवगणच्या लेकीनं हॉट शॉर्ट्स घालून मलायकाला दिली तगडी स्पर्धा, फिटनेसचंही लोकांनी केलं कौतुक)

​कॉर्सेट चोळीने वेधलं लक्ष

dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण - dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला दियाला आवडतात. या लेहंग्याची निवड करताना देखील तिने काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला. लेहंग्यावर तिने मॅचिंग कॉर्सेट चोळी परिधान करणं पसंत केलं. या चोळीवर गोल्डन फ्लोरल मोटिफ्स प्रकाराची हेवी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. तसेच यावर सोनेरी तारेने वर्क करण्यात आलं होतं. या चोळीला हॉट लुक देण्यासाठी स्वीट हार्ट नेकलाइन आणि डिप नेकलाइनचा वापर करण्यात आला. तसेच ऑर्गेंजा फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेली ओढणी दियाने परिधान केली होती. या ओढणीला गोटा पट्टीची जोड देण्यात आली होती.

(पार्टी शाहरुखची चर्चा मात्र करिना कपूरची, बोल्ड अन् हॉट अवतारा पुढे इतर अभिनेत्रीही पडल्या फिक्या, तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक्)

​परफेक्ट दागिने

dia mirza hot and bold look: बोल्ड अन् आकर्षक लेहंग्यामध्ये दिसली दिया मिर्झा, अभिनेत्रीची मादक अदा व हॉटनेस पाहून सारेच झाले हैराण - dia mirza looks hot and glamorous in a lehenga designed by fashion designer anita dongre

या लेहंग्यामधील दियाचे फोटो पाहता तिची ड्रेस निवडण्याची कला अगदी उत्तम आहे हे लक्षात येतं. ड्रेसबरोबरच दागिन्यांची निवड देखील ती उत्तम करते. या लेहंग्यावर देखील तिने साधेच दागिने घालणं पसंत केलं होतं. मोठे कानातले, हातात अंगठी दियाने घातली होती. अनिता डोंगरेच्या ज्वेलरी लेबलचेच दागिने तिने निवडले होते. त्याचबरोबरीने तिचा मेकअपदेखील अगदी साधा होता. लाइट फाउंडेशन, सॉफ्ट स्मोकी आइज, लाइट लिपस्टिक शेड असा तिचा मेकअप होता. तसेच केसांचा देखील राउंड ऑफ शेप करत बन तिने तयार केला होता.

(दिराच्या लग्नात नटून-थटून पोहोचली जेनेलिया डिसुझा, नवरीला सोडून तिच्यावरच खिळल्या साऱ्यांच्या नजरा)Source link