distribution of corporations: महामंडळ वाटपाचा मुद्दा ऐरणीवर; महाविकास आघाडीत मात्र मतभेद? – disagreement in mahavikas aghadi on the issue of distribution of corporations

0
29


हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीमध्ये महामंडळ वाटपाचा मुद्दा चर्चेत असून या मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • महामंडळांचे वाटप तिन्ही घटक पक्षांमध्ये समसमान व्हावे असे काँग्रेसची अपेक्षा आहे.
  • तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे वाटप आमदारांच्या संख्येनुसार होईल असे म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये महामंडळ वाटपाचा मुद्दा चर्चेत असून या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामंडळांचे वाटप तिन्ही घटक पक्षांमध्ये समसमान व्हावे असे काँग्रेसची अपेक्षा असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे वाटप आमदारांच्या संख्येनुसार होईल असे म्हटले आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही ते बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. (disagreement in mahavikas aghadi on the issue of distribution of corporations)

महामंडळांचे वाटप करण्याबाबत मुंबईतील सह्याद्री या अतिथीगृहात महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, तसेत शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. येत्या काही दिवसात महामंडळाचे वाटप करण्यात येईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ८,४७० नव्या रुग्णांचे निदान; ९,०४३ झाले बरे, मृत्यू १८८

महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये महामंडळांचे वाटप समान होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे वाटप आमदारांच्या संख्येनुसार होईल, असे म्हटले आहे. तीन घटकपक्षांपैकी शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे संख्येनुसार वाटप झाल्यास सर्वाधिक महामंडळे शिवसेनेकडे येणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘या’ जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका १९ जुलैला, २० जुलैला मतमोजणी

मागील युती सरकारच्या काळात जी महामंडळे शिवसेनेकडे होती, ती सर्व महामंडळे आजही शिवसेनेकडे आहेत. तसेच श्री. सिद्धीविनायक सारखी महत्वाची समजली जाणारी १२ महामंडळे शिवसेनेकडे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महामंडळे वाटपाची मागणी होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास नवल वाटायला नको’; भाजप नेत्याचे वक्तव्य

आजच्या महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीबाबत मिळालेल्या माहतीनुसार, शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळू शकते. तर, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शिर्डी संस्थान अध्यक्ष म्हणून आशुतोष काळे यांच्या नाव निश्चित होऊ शकते. तर विश्वस्त अजित कदम,पांडुरंग अभंग, संग्राम कोते, संदिप वर्पे, अनुराधाताई आदिक यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.Source link